चिनावल येथे धर्मनाथ बीज निमित्त हजारो भाविकांनी केला सामुहिक नवनाथ नामाचा गजर
चिनावल येथे धर्मनाथ बीज निमित्त हजारो भाविकांनी केला सामुहिक नवनाथ नामाचा गजर
लेवाजगत न्यूज चिनावल :- रावेर यावल तालुक्यातील समस्त स्वामी समर्थ भक्तगण आयोजित धर्मनाथ बीज निमित्त एकदिवसीय सामूहिक पारायण आज दि २३ रोजी येथील जागृत नवनाथ मंदीर व परिसरात हजारो भाविकांनी नवनाथ पारायणाचा गजर केला
गेल्या काही वर्षांपासून चिनावल येथील जागृत नवनाथ मंदीर व परिसरात धर्मनाथ बीज चे मुहूर्त साधत श्री नवनाथ व जागृत नवनाथ मंदीर कृपेने भक्तगण श्रद्धेने आपल्या जीवनात सुख समाधान व अध्यात्माची आवड निर्माण होण्यासाठी मोठ्या संख्येने येथे दूरदूरुन पारायणा साठी महिला पुरुष एक दिवस आधीच चिनावल येथे दाखल झाले होते
चिनावल येथील नवनाथ मंदीर परिसरात नवनाथाचे पारायण केल्याने चौदा विद्या व चौसष्ट कला प्राप्त होण्यास सुरुवात होते तसेच पारायण वेळी ज्या भाविकानी ठेवलेले नारळात एक अध्यातिक उर्जा प्राप्त होवून आपोआप नारळ फुटते त्याचेवर स्वामी समर्थाची विषेष कृपा प्राप्त होते अशी आख्यायिका येथे कथन केली जाते या मुळे येथे मलकापूर,बुलढाणा ,जळगाव , नाशिक, वर्धा, भुसावळ, यावल, रावेर परिसरातून भाविक विषेष करून महिला पारायणा साठी मोठ्या संख्येने हजर असतात यंदा ही या पारायणासाठी चिनावल हजारो भाविकांनी फूलून गेले होते
पारायण साठी उपस्थित भाविकांना जागेवरच पारायण ग्रथ व आसन उपलब्ध करुन दिले होते तर चहा, नाश्ता व महाप्रसादाची व्यवस्था अगदी नियोजनबद्ध केली होती. सकाळी ८ वाजता सुरू झालेले पारायण तब्बल ८ तास अखंड सुरू होते ह्या पारायणा वेळी रावेर यावल चे आमदार शिरीष दादा चौधरी, तसेच डॉ कुंदन फेगडे, यांनी भेट देऊन दर्शन घेतले उत्कृष्ट अशा नियोजनबद्ध पारायणा साठी रावेर यावल श्री स्वामी समर्थ भक्तगण, विस्तार अधिकारी अरविंद कोलते, बाळू पाटील सर, जितू वर्मा, शरद बोरोले, दामोदर महाजन, सुनिल भंगाळे व नवनाथ मंदीर परिसरातील नागरिक व चिनावल येथील ग्रामस्थांनी विषेष परिश्रम घेतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत