सावद्यातआज खंडोबा-म्हाळसाई लग्न सोहळा होणार
सावद्यातआज खंडोबा-म्हाळसाई लग्न सोहळा होणार
लेवाजगत न्यूज सावदा-येथील जागृत देवस्थान तीर्थक्षेत्र खंडोबा मंदिरात पौष पौर्णिमा व शाकंभरी पौर्णिमेनिमित्त श्री देव खंडोबा महाराज व म्हाळसाई यांचा लग्न सोहळा विधिवत पद्धतीने शुक्रवारी संध्याकाळी मोठ्या जल्लोषात होणार आहे.
प्रारंभी संध्याकाळी सहा वाजता श्री खंडोबा महाराजांच्या मूर्तीची गावातील प्रमुख मार्गावरून भव्य वरात काढण्यात येईल. त्यानंतर मंदिराजवळ मिरवणूक पोहोचल्यानंतर खंडोबा देवासोबत लग्नासाठी म्हाळसाईला हळद लावण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री सात वाजता लग्न सोहळा धार्मिक पद्धतीने व विधिवत पूजन करून जल्लोषात साजरा होईल, असे खंडोबा मंदिराचे पुजारी राहुल पवार (भगत) व अशोक भगत यांनी कळवले आहे. भाविकांनी या लग्न सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत