Contact Banner

विहिरीत पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी आईने थेट विहिरीत मारली उडी, परंतु…

विहिरीत पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी आईने थेट विहिरीत मारली उडी, परंतु…


विहिरीत पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी आईने थेट विहिरीत मारली उडी, परंतु…

वृत्तसंस्था बुलढाणा-शेतातील विहिरीमध्ये पाणी काढताना तोल गेल्याने मुलगी विहिरीत पडली. यामुळे क्षणाचाही विलंब न करता मुलीला वाचविण्यासाठी आईने थेट विहिरीत उडी घेतली. मात्र, दुर्दैवाने तळाशी जाऊन अडकल्यामुळे या घटनेत आईचा मृत्यू झाला तर मुलगी सुदैवाने वाचली.

   खामगाव तालुक्यातील कोंटी येथे ही दुर्देवी घटना घडली.  बेबीबाई उमा खताळ (४०) असे मृत आईचे नाव आहेत. बेबीबाई  खताळ ह्या आपल्या मुलीला घेऊन सकाळी शेतात गेल्या होत्या. दरम्यान, कुमारी आकांक्षा (१४) ही विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेली असता अचानक तोल जाऊन विहिरीत पडली. मुलगी पाण्यात पडल्याचे लक्षात येताच आई बेबीबाईने  मुलीला पाण्यातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

    परंतु, मुलगी पाण्यात खोलवर बुडत असल्याचे पाहून कुठलाही विचार न त्यांनी थेट विहिरीत उडी घेतली. मात्र, पाणी खोल असल्यामुळे त्या पाण्याच्या तळाशी गेल्या. यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. मुलगी आकांशाने विहिरीतील पाली पकडून ठेवल्याने ती सुदैवाने वाचली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.