महिला कुस्तीपटूंनीकेला लैंगिक शोषणाचा गौप्यस्फोट
महिला कुस्तीपटूंनीकेला लैंगिक शोषणाचा गौप्यस्फोट
लेवाजगत न्यूज नवीदिल्ली -लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह चांगलेच अडचणीत आले आहेत. महिला कुस्तीपटू आता उघडपणे लैंगिक शोषणाचा गौप्यस्फोट करत आहेत. दिल्लीच्या ५ ते ६ तसेच महाराष्ट्राच्याही महिला कुस्तीपटूंकडे लैंगिक शोषणाचे सबळ पुरावे असून आम्ही अध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना तुरुंगात पाठवू, असे बजरंग पुनिया म्हणाला.
जंतर-मंतरवर गुरुवारीही मल्लांचे धरणे सुरूच होते. रात्री क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या निवासस्थानी मल्लांची बैठक झाली. दरम्यान, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना राजीनामा देण्याचे आदेश क्रीडा मंत्रालयाने दिले आहेत.
भीतीच्या छायेत स्पर्धेत खेळत होत्या कुस्तीपटू
देशामध्ये मुलींचा जन्मच होऊ नये : विनेश फोगट
मल्ल विनेश फोगट म्हणाली, आम्हाला न्याय मिळाला नाही तर एकही मुलगी सुरक्षित नाही. दुसरी महिला कुस्तीपटू म्हणाली, एक प्रशिक्षक मला म्हणाला होता, ‘साथ’ दिल्यास राष्ट्रीय स्पर्धेत पुढे जाऊ देईन.
महिला मल्लांच्या समोरच बृजभूषणची रूम ज्युनियर वर्ल्डकपच्या वेळी बृजभूषण सिंह नियमांच्या विरुद्ध हॉटेलमध्ये महिला कुस्तीपटूंच्या रूमच्या समोरील रूमध्येच राहत होते, असा आरोप कुस्तीपटू अंशू मलिकने केला आहे. बृजभूषण सिंह नेहमीच आपल्या खोलीचा दरवाजा उघडा ठेवत होते. यामुळे महिला कुस्तीपटूंना येता-जाता अडचणीचे वाटत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत