Contact Banner

सर्प दंशामुळे बारावीच्या विद्यार्थीनीचा मृत्यू

 

12th-student-death-due-to-snake-bite

सर्प दंशामुळे बारावीच्या विद्यार्थीनीचा मृत्यू

वृत्तसंस्था नाशिक-येवला तालुक्यातील राजापूर येथील पन्हाळपाटी शिवारात सर्पदंशाने विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. राजापूर येथील प्रगती वाघ ही इयत्ता १२ वी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ती आईवडिलांना शेतीच्या कामात मदत करीत असे. रविवारी प्रगती शेतात काम करत असतांना तिला साप चावला. अशा परिस्थितीतही ती दुचाकी चालवित राजापूर गावापर्यंत आली. नंतर मात्र ती बेशुध्द झाली. नातेवाईकांनी तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतांना अखेर तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.