‘सीबीएसई’ दहावीच्या इंग्रजी पेपरमध्ये चुकीचे पर्याय; सामायिक गुण देण्याची मागणी
‘सीबीएसई’ दहावीच्या इंग्रजी पेपरमध्ये चुकीचे पर्याय; सामायिक गुण देण्याची मागणी
वृत्तसंस्था चंद्रपूर:-बारावीच्या पेपरमधील चुकांनंतर आता ‘सीबीएसई’ बोर्डाच्या दहावी इंग्रजी विषयाच्या परीक्षेत पाठ्यपुस्तकातील एका धड्याचा आधार घेऊन ‘मिस्टर किसींग हा व्यक्ती कोण होता?’ असा प्रश्न विचारल्या गेला. तो व्यक्ती गणिताचा शिक्षक असल्याचे धड्यात स्पष्ट नमूद असताना बोर्डाने ‘गणित’ विषय सोडून अन्य चुकीचे पर्याय दिले. गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी कोणतेही उत्तर लिहिले नाही. त्यामुळे सामायिकपणे विद्यार्थ्यांना एक गुण देण्यात यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
सीबीएसई शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला सोमवार, २७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा होता. प्रश्नपत्रिकेच्या सेक्शन ‘सी’च्या ‘लिटरेचर’वरील प्रश्नात ‘मिस्टर किसींग कोण होता? असा प्रश्न होता. उत्तरादाखल चार पर्याय दिले होते. त्यातील एक निवडायचा होता. तो इंग्रजीचा, सोशल सायंसचा शिक्षक, वार्डन आणि प्रिंसीपल होता, असे त्या चार पर्यायांत नोंदवले गेले होते. पाठ्यपुस्तकातील धड्यात तो व्यक्ती गणिताचा शिक्षक असल्याचे नमूद आहे. मात्र, गणित हा विषय पर्यायात नसल्याने विद्यार्थी गोंधळात पडले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध पर्यायापैकी एक पर्याय निवडला. मात्र, पर्यायच चुकीचे असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवला, त्यांना गुण देण्यात यावे, अशी मागणी आता होत आहे.बोर्डाच्या बारावी परीक्षेत एक मोठी चूक नुकतीच उघडकीस आली होती. यानंतर बोर्डाकडून त्याचे सहा गुण जाहीर करण्यात आले. Statistics आता सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेतही अशी चूक झाल्याने एकूण परीक्षेच्या यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत