“माझं राजकारणातील नाव उदयसिंह उद्धव बाळासाहेब ठाकरे”, आमदार उदयसिंग राजपूत यांचं विधान!
“माझं राजकारणातील नाव उदयसिंह उद्धव बाळासाहेब ठाकरे”, आमदार उदयसिंग राजपूत यांचं विधान!
वृत्तसंस्था औरंगाबाद-महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटाच्या बाजुने निकाल दिला आहे. निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह शिंदे गटाला बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून संबंधित निर्णय अनपेक्षित असल्याचं म्हटलं आहे.
या सर्व घडामोडीनंतर कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडलं आहे. मी ज्यांना निष्ठावंत समजत होते. ते नेते डुप्लिकेट निघाले. आज मी निष्ठावंत म्हणून समोर बसलो आहे, असं विधान आमदार राजपूत यांनी केलं. ते औरंगाबाद येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी उदयसिंह राजपूत आपल्या भाषणात म्हणाले, “माझं नाव उदयसिंह चित्रासरदारसिंह राजपूत आहे. पण माझं राजकारणातील नाव उदयसिंह उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आहे. त्यामुळे मी व्हीप संदर्भात उद्धव ठाकरे यांचाच आदेश पाळणार… बंडोखोरीच्या आधी मी आमदारांच्या रांगेत सगळ्यात मागे बसायचो. मला वाटायचं समोर बसलेले निष्ठावंत असतील. पण ते तर डुप्लिकेट निघाले. आज मी निष्ठावंत म्हणून समोर बसलो आहे. निष्ठावान हे काही कपाळावर लिहिलेलं नसतं. कारण पहिल्या दिवशी बाजुला बसलेले आमदार दुसऱ्या दिवशी गुवाहाटीत दिसले. सध्या उद्धव ठाकरेंची खूप क्रेझ वाढली आहे. त्यामुळे जो उठतो तो उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करतो, असं मत आमदार उदयसिंग राजपूत यांनी व्यक्त केलं.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत