फेसबुकवर ओळख झालेल्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चित्रीकरण करून मुलीला पाठवले
फेसबुकवर ओळख झालेल्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, चित्रीकरण करून मुलीला पाठवले
वृत्तसंस्था मुंबईः फेसबुवर ओळख झालेल्या मित्राने १४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रीकरण तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर पाठवल्याचा प्रकार फोर्ट परिसरात घडला आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी व पीडित मुलीची फेसबुकवर ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने आझाद मैदान येथील हॉटेलमध्ये नेऊन पीडित मुलीवर लैगिक अत्याचार केला. त्याचे चित्रीकरण त्याने मुलीला पाठवले होते. पीडित मुलगी शाळेत गेली असताना तिची आई व मोठ्या बहिणीने तिचे इन्स्टाग्राम खाते तपासले असता त्यात एका तरूणाकडून मुलीचे अश्लील चित्रीकरण असलेल्या सहा चित्रफीती पाठवल्या असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत विचारले असता पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून आरोपी तरूणाविरोधात एम.आर.ए. मार्ग पोलिसांनी भांदवि कलम ३७६ (३) व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुरूवारी गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत