Contact Banner

पाडव्यापासून मिळणार आनंदाचा शिधा

 


पाडव्यापासून मिळणार आनंदाचा शिधा 

लेवाजगत न्यूज सावदा -गुढीपाडवा आणि डाॅ. बाबासाहेब‎ आंबेडकर जयंतीनिमित्त शहर व‎ तालुक्यातील रेशन दुकानांमधून‎ १०० रुपयांमध्ये ‘आनंदाचा शिधा’‎ हे धान्य कीट मिळणार आहे.‎

     राज्य शासनाने दिवाळीत‎ आनंदाचा शिधा कीट दिले होते.‎ आताही गुढीपाडवा आणि डाॅ.‎ बाबासाहेब आंबेडकर‎ जयंतीनिमित्त पात्र कार्डधारकांना‎ रवा, चनाडाळ, साखर व एक‎ लिटर पाम तेल असा आनंदाचा‎ शिधा मिळेल. गुढीपाडव्यापासून‎ पुढील महिन्याच्या‎ कालावधीसाठी ई-पाॅसद्वारे वाटप‎ होईल. ज्या ठिकाणी ई-पाॅसची‎ व्यवस्था नसेल तेथे ऑफलाइन‎ पद्धतीने हा शिधा देण्यात येईल.‎ त्यासाठी पुरवठा विभागाने‎ किटची मागणी केली आहे.‎

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.