Contact Banner

व्हि.जी.पाटील खून खटला आरोपी राजू सोनवणेची अठरावर्षानंतर निर्दोष मुक्तता

व्हि.जी.पाटील खून खटला आरोपी राजू सोनवणेची अठरावर्षानंतर निर्दोष मुक्तता


व्हि.जी.पाटील खून खटला आरोपी राजू सोनवणेची अठरावर्षानंतर निर्दोष मुक्तता 

वृत्तसंस्था जळगाव -काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही. जी. पाटील यांचा २१ सप्टेंबर २००५ रोजी चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी राजू चिंतामण सोनवणे याला औरंगाबाद खंडपीठाने निर्दाेष मुक्त केले. न्यायालयाने १७ फेब्रुवारी ऑपरेटीव्ह ऑर्डर दिली आहे. कोणत्या परिस्थितीत, कारणांमुळे निर्दाेष सोडले याची सविस्तर ऑर्डर अद्याप अपलोड झालेली नाही. तब्बल १८ वर्षांनंतर तो निर्दाेष झाला.

     या गुन्ह्यातील राजू सोनवणेचा सहआरोपी राजू माळी याचा खटला सुरू असतांना ६ एप्रिल २००७ रोजी मृत्यू झाला. दरम्यान, जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याचा तपास काही तासातच तत्कालिन पोलिस निरीक्षक वाय. डी. पाटील यांच्याकडून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. एका रात्रीतून पुन्हा हा गुन्हा सीआयडीकडे तपासाला देण्यात आला.

      यानंतर सीबीआयने तपास पुर्ण करुन न्यायालयात दोषारोप दाखल केले. चार्जशीट दाखल केले होते. त्यात ४६ साक्षीदार होते. त्यातील तीन प्रत्यक्षदर्शी होते. परंतू बहुतांश साक्षीदारांनी मृत राजू माळी यांना ओळखले होते. राजू माळी मृत झाला होता. तर जिल्हा न्यायालयाने राजू सोनवणे याला दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

     या शिक्षेच्या विरुद्ध राजू सोनवणे याने २०१५ मध्ये उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्यावर जिल्हा न्यायालयातील सोनवणेचे वकील अ‍ॅ​​​​​​ड. एस. के. कौल, अ‍ॅ​​​​​​ड. विजय शर्मा यांनी सादर केलेला लेखी युक्तीवाद पुढे उच्च न्यायालयात देखील सादर करण्यात आला. सोनवणे याच्यावतीने उच्च न्यायालयात विधी सेवा प्राधिकरणाकडुन अ‍ॅ​​​​​​ड. काझी यांचा युक्तीवाद केला. गेल्या चार महिन्यात ही सुनवणी पुर्ण झाली. यांनतर न्यायाधीश विभा कंकणवाडी व अभय वाघवासे यांनी सोनवणेला निर्दाेष मुक्त केले.

     पोलिस तपासात लिलाधर नारखेडे व दामू लाेखंडे यांची नावे समोर अली होती. ६ नोव्हेंबर २००५ रोजी पोलिसांनी दोघांना अटक केली. नंतर त्यांना जामीनावर मुक्त करण्यात आले. दरम्यान, या दोघांच्या विरुद्ध अद्याप जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ४ मार्च रोजी सुनावणीची तारीख आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.