Contact Banner

तरूणाच्या मृत्यूनंतर भुसावळ यावल मार्गावर अकलुद येथे संतप्त जमावाचा रास्ता रोको

 

लेवाजगत न्यूज

तरूणाच्या मृत्यूनंतर भुसावळ यावल मार्गावर अकलुद येथे संतप्त जमावाचा रास्ता रोको 

लेवाजगत न्यूज भुसावळ - तापी नदीच्या काठावरील कासवा गावातील तरूणाचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने भुसावळ सावदा मार्गावर अकलुद येथे रास्ता रोको करून आपला रोष व्यक्त केला.

     या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, कासवा ता. यावल येथील शुभम सपकाळे या तरूणावर अकलून येथे चाकूने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असतांनाच काल सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

     दरम्यान, आज सकाळी शुभमचा मृतदेह घेऊन त्याचे आप्तस्वकीयांसह अकलूद येथील नागरिकांनी टोल नाक्याजवळच्या चौकात रस्त्यावरच ठिय्या मांडत रास्ता रोको आंदोलन सुरू केले. शुभमच्या तीन मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी करत याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर, ठिय्या मांडल्यामुळे तिन्ही रस्त्यांवर वाहनाची मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचे दिसून आले.

संतप्त जमावाचा रस्ता रोको
चाकू हल्ल्यातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यासह त्यांना गावात राहू देण्यास पायबंद घालावा या मागणीसाठी संतप्त नातेवाईकांसह जमावाने यावल महामार्ग सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास रोखून धरला. पोलिस यंत्रणेने धाव घेत जमावाची समजूत घातल्यानंतर तासाभराने वाहतूक खुली झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.