Contact Banner

कर्तव्य बजावत असताना पोलीसाचा हृदयविकाराने मृत्यू

 

कर्तव्य बजावत असताना पोलीसाचा हृदयविकाराने मृत्यू

कर्तव्य बजावत असताना पोलीसाचा हृदयविकाराने मृत्यू 

लेवाजगत न्यूज भुसावळ -शहर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. सागर दिलीप देहाडे असे मयत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मयत सागर हा अवघ्या ३२वर्षाचा होता. सागर हा नेहमी प्रमाणे सकाळी पोलिस ठाण्यात आला. हजेरी मस्टरवर एन्ट्री करुन समंस बजावणीसाठी निघाला. तितक्यात छातीत दुखू लागल्याने जागीच बसला. त्याला तातडीने ट्रामा केअर सेंन्टरला दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने गोदावरी हॉस्पिटल येथे नेत असतांना रस्त्यात त्यांची प्राणज्योत मालविली. मयत सागर याच्या पश्चात गरोदर पत्नी, मुलगा असा परीवार आहे.  जळगाव येथे मुळ घरी नेण्यात येवून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.