सावद्यात जनमित्रांचा लाईनमन दिनानिमित्त कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांनी केला गौरव सुरक्षिततेची घेतली शपथ
सावद्यात जनमित्रांचा लाईनमन दिनानिमित्त कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांनी केला गौरव
सुरक्षिततेची घेतली शपथ
लेवाजगत न्यूज सावदा- केंद्रशासन याचे आदेशानुसार दिनांक ४ रोजी या लाईन मन दिनाचे अवचित्त्य साधून येथील विभागीय कार्यालयाचा पार्किंग परिसरात कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे व उपविभागीय अभियंता राजेश नेमाडे यांचेसह मान्यवर याचे हस्ते जीवाची पर्वा न करणारे स्थानिक व परिसरातील सर्व नागरिकांना प्रकाश देणारे "लाईनमन "वर्ग याना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
हा व्हिडीओ पहा-सावद्यात लाईनमनच्या कार्याचा कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे,स.अभियंता राकेश नेमाडेंनी केला गौरव-
लाईनमन ची किंमत आजही समाजात टिकून आहे.लाईनमनने आपल्या सुरक्षेसाठी सुरक्षिततेची साधने वापरली पाहिजे. तुम्ही जनमानासांशी कसे वागतात त्याच्यावर आपली व आपल्या कंपनीची प्रतिमा तयार होते व जनता आपल्याला किंमत देत असते. आपली कामे आपल्यालाच करावी लागणार त्यासाठी स्वतःहून काम करण्याची प्रवृत्ती निर्माण करा व आपल्या महावितरण चे नाव जनमानसात टिकून ठेवा असे प्रतिपादन सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांनी यावेळी केले.
या प्रसंगी सावदा विभागातील लाईनमन याचा सत्कार करण्यात आला यात प्रसंगी उपअभियंतासहाय्यक अभियंता, सावदा शहर हेमंत शिवाजी चौधरी, विरोदा सागर डोळे,कुंभारखेडा सचिन गुफ्ने , वाघोदा , प्रसन्न सोळुंके निंभोरा, किनगे थोरगवान योगेश चौधरी ,दसनुर मंगेश यादव , चिनावल योजना चौधरी,तांदलवाडी सचिन गुलाने मस्कावद भुषण -पाटील याचे उपस्थित होते. सहाय्यक अभियंता, सावदा शहर हेमंत शिवाजी चौधरी विरोदा सागर डोळे सचिन गुफ्ने कुंभारखेडा, वाघोदा प्रसन्न सोळुंके, निंभोरा किनगे, थोरगव्हाण योगेश चौधरी ,दसनुर मंगेश यादव,
चिनावल योजना चौधरी,तांदलवाडी सचिन गुलाने, मस्कावद भुषण -पाटील,सावदा अर्बन लाईनमन व बरकत तडवी, चिनावल पदमाकर चौधरी,कोचुर अरुण पाटील,खिरोदा सोपान कोळी, कुंभारखेडा विशाल मावळे,वाघोदा अनिल जिरीमाळी, मस्कावद गं.भा. कोकीळाबाई सोंडे,दसनूर इक्बाल तडवीं, निंभोरा किरण महाजन,थोरगव्हाण पवन चौधरी, तांदलवाडी मच्छिंद्रनाथ चौधरी, यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी १५० लाईनमन उपस्थित होते.कार्यक्रमात उपयुक्त असणारे सुरक्षा उपकरणे ठेवण्यात आली होती,काही लाईनमन यांनीही सुरक्षे विषयी आपले विचार व्यक्त केले.या वेळी सर्व उपस्थितांनी सुरक्षितते विषयी शपथ घेतली.हा कार्यक्रम या वर्षी प्रथमच झाल्याने सर्व कर्मचारी वर्ग खुश व आनंदी होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत