गुढीपाडवानिमित्त भेंडखळ मध्ये शोभायात्रेचे आयोजन
गुढीपाडवानिमित्त भेंडखळ मध्ये शोभायात्रेचे आयोजन
लेवाजगत न्यूज उरण (सुनील ठाकूर )-चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा निमित्त दरवर्षी प्रमाणे मराठी नविन वर्षाचे स्वागतासाठी यात्रेचे आयोजन एकदम शांत वातावरणत केले होते.शोभा यात्रेसाठी ग्रामपंचायतिचे उपसरपंच सौ. संगीताताई भगत, सदस्या सौ. सोनलताई ठाकूर, सौ. स्वातीताई घरत, सौ. प्राचीताई ठाकूर, सौ. अक्षताताई ठाकूर, सौ. स्वातीताई ठाकूर व सदस्य श्री लिलेश्वर भगत, श्री अजित ठाकूर दीपक ठाकूर व श्री अभिजित ठाकूर तसेच सामाजिक कार्यकर्ते सूरज ठाकूर साहेब, श्री कृष्णा ठाकूर माझी उपसरपंच,जेष्ठ नागरिक के एस ठाकूर, रायगड भूषण नरेश ठाकूर, लक्ष्मण ठाकूर विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळ, शाळेतील विद्यार्थी व शिक्षक विकास सर उपस्थित होते.
गावातील भजन मंडळ मृदंग टाळ व अभंगाणे सुरवात करून ग्राम प्रदक्षिणा करण्यात आली. त्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजयांच्यावर गिते सादर केली, महाराष्ट्र गीत गाण्यात आले यासाठी गायक श्री बळीराम भोईर, दिलीप म्हात्रे, जगेन्द्र भोईर, सौ. रेखा ठाकूर व प्रकाश ठाकूर व त्यांना नाळ व मृदंग ची साथ श्री तुळशीदास म्हात्रे, प्रथम घरत व स्वप्नील घरत यांनी केली, मुख्य आकर्षण बाळकलाकार कु. चित्राक्ष घरत यांनी ढोलकी वादन केले .
या कार्यक्रमाचे आयोजन श्री चंद्रविलास घरत अध्यक्ष फ्रेंड्स सामाजिक कलामंच यांनी केले होते. त्यासाठी सहकार्य सौ. रेखाताई ठाकूर अध्यक्षा नारी शक्ती महिला मंडळ महालन विभाग, किरण घरत अध्यक्ष जरीमरी नवरात्रौ उत्सव मंडळ, सुरज ठाकूर सामाजिक कार्यकर्ते, प्रा. प्रांजल भोईर, राकेश भोईर मनसे तालुका अध्यक्ष, श्री काशिनाथ पाटील शुभमंगल वाद्यवृंदाचे प्रमुख, श्री अशोक ठाकूर खजिनदार सार्वजनिक चथुर्थी मंडळ, सौ. वनिता भोईर आदी उपस्थित होते . या प्रसंगी फ्रेंड्स सामाजिक कलामंच वतीने शाळेतील मुलांना भेट वस्तू देण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत