'एच ३ एन २'सॊबत कोरोना झालेल्या रुग्णाचा मृत्यू
'एच ३ एन २'सॊबत कोरोना झालेल्या रुग्णाचा मृत्यू
प्रतिनिधी नगर -देशात नव्याने आढळलेल्या 'एच ३ एन २' विषाणूसह कोरोना बाधित असलेल्या रुग्णाचा नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एका मेडिकल कॉलेजचा तो विद्यार्थी होता, असे सांगण्यात येत असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. त्याच्या संपर्कातील १९ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. देशभरात 'एच ३ एन २' या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील अनेक शहरातही रुग्ण आढळले असून, नगरमध्येही संशयित रुग्ण आढळून आला आहे. एका मेडिकल कॉलेजचा तो विद्यार्थी असून, बाहेर फिरून आल्यानंतर त्याला फ्ल्यूची लक्षणे दिसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इन्फ्लूएन्झा ए. एच ३ एन २'सह तो कोरोना बाधित असल्याचा अहवाल रुग्णालयाने दिला आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत