जळगाव येथे रेमंड परिसरात जमावबंदी
जळगाव येथे रेमंड परिसरात जमावबंदी
लेवाजगत न्यूज जळगाव -शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या रेमंड कंपनीत कामगार संघटनांचे कामबंद आंदाेलन सुरू आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी महेश सुधळकर यांनी २८ फेब्रुवारी ते ३ मार्च रात्री १२ वाजेपर्यंत जमाबंदी कलम लागू केले आहे. कंपनीसह २०० मीटर सर्व बाजूने कोणतीही अनधिकृत व्यक्ती किंवा व्यक्तींच्या समूहास प्रवेश करण्यास प्रतिबंध आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्याने कामगार नेते ललित काेल्हेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. २४ फेब्रुवारी रोजी रेमंड कंपनीच्या कामगारांच्या अनधिकृत संघटन खान्देश कामगार उत्कर्ष संघटनेद्वारे कंपनीच्या परिसरात बेकायदेशीर पद्धतीने संप पुकारून अंदाजे २२५ ते २५० कामगार एकत्र जमवत आहे. कंपनीचे काम बंद पाडत गोंधळ व अशांततेचे वातावरण निर्माण झाल्याबाबत कंपनीने जळगाव येथील जिल्हाधिकाऱ्यांना २५ फेब्रुवारी रोजी निवेदनाद्वारे कळवले आहे. यापूर्वी देखील रेमंड कंपनीच्या परिसरात याचप्रकारे संप पुकारुन कंपनीचे काम बंद केल्याच्या घटना कामगारांद्वारे झाल्या असल्याचे समाेर आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत