Contact Banner

आमदार संतोष बांगर पुन्हा वादात : ऑडिओ क्लीप व्हायरल

MLA-Santosh-Bangar-again-in-controversy-audio-clip-viral


आमदार संतोष बांगर पुन्हा वादात : ऑडिओ क्लीप व्हायरल

लेवाजगत  न्यूज मुंबई -शिवसेनेचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडले असून त्यांची आक्षेपार्ह क्लीप सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

    आमदार संतोष बांगर यांची शिवीगाळ करणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. अयोध्या पोळ-पाटील या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकार्‍यांने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार संतोष बांगर आणि एक अज्ञात व्यक्ती एकमेकांना अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत आहेत. यावरून वाद सुरू झाले आहेत.

MLA-Santosh-Bangar-again-in-controversy-audio-clip-viral


    आमदार संतोष बांगर हे आधी देखील अनेकदा वादात सापडले होते. आता पुन्हा त्यांची क्लीप व्हायरल झाल्याने यावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. तर बांगर यांनी अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.