Contact Banner

महाविकास आघाडीचे लोकसभेसाठी जागा वाटप ठरले ?

 

महाविकास आघाडीचे लोकसभेसाठी जागा वाटप ठरले

महाविकास आघाडीचे लोकसभेसाठी जागा वाटप ठरले ?

लेवाजगत न्यूज मुंबई-Maha Vikas Aghadi Lok Sabha Seat Sharing Formula : पुढच्या वर्षी (२०२४) होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असल्याच्या बातम्या आज सकाळपासून माध्यमांवर पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातल्या एकूण ४८ जागांपैकी २१ जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला, १९ जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि केवळ ८ जागा काँग्रेस लढवणार असल्याच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या आहेत. दरम्यान, “या सर्व बातम्या खोडसाळ असल्याचं कांग्रेस नेते अतुल लोंढे यांनी महाविकास आघाडीच्या वतीने स्पष्ट केलं आहे.”

अतुल लोंढे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, “लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची, जिल्हाध्यक्षांची एकत्रित बैठक नुकतीच पार पडली. आम्ही आगामी काळात होणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढू असा निर्धार केला आहे. परंतु कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढेल हे अद्याप ठरलेलं नाही.”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.