Contact Banner

पोलीस अधिकाऱ्यासह पत्नीलाही कोरोनाची लागण

 

पोलीस अधिकाऱ्यासह पत्नीलाही कोरोनाची लागण


पोलीस अधिकाऱ्यासह पत्नीलाही कोरोनाची लागण 

लेवाजगत न्यूज यावल- कोरोना नियंत्रणात आल्याचा दावाभलेही होत असला तरी अलीकडे भुसावळ दोन कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आता यावलच्या पोलीस निरीक्षकांसह त्यांच्या संभाव्यवतींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. दोघांचे प्रकृती स्थिर असली तरी जिल्ह्यात कोरोना अद्याप तळ ठोकून असल्याचे स्पष्ट झाल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगून सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.      

      यावल पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना सपत्नीक कोरोना लागण झाली असून पहिल्या टप्प्यातील लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांनी तातडीने तपासणी करून घेतल्यानंतर घरीच त्यांच्यावर उपचार सुरू असून दोघांचे प्रकृती स्थिर आहे. दोघांना गेल्या चार दिवसापासून ताप आल्याने स्वतःहून या दापत्यांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली यात त्यांना त्यांचा आरटीपीसीआर अहवाल हा बाधित आल्याने दोघांना घरीच उपचार सुरू करण्यात आले. आपल्या निवासस्थानी हे दापत्य कॉरंटाईन असून प्रथम टप्प्यातील लक्षणे असल्याने त्यांच्यावर उपचार झाले असून दोघांची प्रकृती स्थिर आहे .कोरोना संदर्भातील लक्षणे जाणवल्या स्वतःहून तपासणी करून घ्यायला हवी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वीच तपासणी करीत प्रथम उपचारात आपण बरे होऊ शकतो असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.