सावदा येथील ग्रामीण रुग्णालय राम भरोसे..! एक ते दीड महिन्यापासून डाँक्टरच नाही,रुग्णवाहिका पडल्याय धूळ खात.
सावदा येथील ग्रामीण रुग्णालय राम भरोसे..! एक ते दीड महिन्यापासून डाँक्टरच नाही,रुग्णवाहिका पडल्याय धूळ खात.
लेवाजगत न्यूज सावदा-पालिका अंतर्गत इतिहास असलेला पालिका दवाखाना शासनाच्या निर्णय व आदेशाने" बंद "करण्यात आला. या शहराची परिस्थिती लक्षात घेता येथे ग्रामीण रुग्णालयास मंजुरी मिळाली व येथे आज मितीस २४ कोटीच्या खर्चाचे रुग्णालयाची इमारत पूर्णत्वात आली आहे.
ग्रामीण रुग्णालय मंजूर झाल्याने त्याच्या इमारतीचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत तात्पुरते ग्रामीण रुग्णालयास सुरू राहावे या उद्देश्यने तात्पुरते रुग्णालय सुरू करण्यात आले होते.तेव्हा रुग्णलयास ३डॉक्टर सह जवळजवळ २४ कर्मचारी असा ऐकूण स्टाफमंजूर होता. तेथे आज मितीस ३ आरोग्य सेविका, १सहाय्यक अधीक्षक,१ कनिष्ठ लिपिक,१ औषध निर्माण अधीक्षक.२ सुरक्षा रक्षक असून ते सेवा बजावत आहे.मंजूर पद काही रिक्त असून त्या जागेवर येथे जे कर्मचारी निवृत्त व राजीनामा देऊन गेले त्याच्या जागा अजूनही रिक्त आहे.
रुग्णालयास दोन रुग्णवाहिका असून असून धूळ खात पडून आहेत. या परिसरात कुठे अपघात व गंभीर रुग्ण नेण्या व आणण्यासाठी खाजगी वाहनाचा वापर करण्यात येतो. येथील रुग्णवाहिका कधीच रुग्णासाठी उपयोगात आणल्याचे दिसत नाही सध्या स्थितीत दोघ रुग्णवाहिका धूळखात उभ्या आहेत.
निव्वळ येथे डाँक्टर नसल्याने सर्व आरोग्ययंत्रणा आजारी स्थितीत आहे. प्रतिदिनी गरजू व गरीब रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात. मात्र गत ( ४६ दिवसा)पासून एक ते दिड महिन्या पासून तेथे डाँक्टरच ( वैद्यकीय अधिकारीच )उपलब्ध होत नसल्याने "रुग्णालय राम भरोसे "असल्याची स्थिती निर्माण झाली आहे .
रुग्णांचे हाल
सावदा शहराचा परिसर व ३२ ग्रामखेडे येत असून या ठिकाणी गत चार-पाच वर्षे असून प्राथमिक तत्त्वावर हे रुग्णालय सुरू झाले असून प्रारंभी काही वेळ त्यांनी बरीच सुरळीत सेवा बजावली. परंतु अपुरा कर्मचारी वर्ग व रुग्णालयात डॉक्टरच नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहे. २४ कोटींची रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली असून फर्निचर व उपकरणे येणे बाकी आहे.
तयार झालेल्या रुग्णालयाच्या तीन रूम मध्ये सध्या स्थितीत ग्रामीण रुग्णालय सुरू असून रुग्ण येत असतात. जास्त गंभीर आजारी रुग्णांना उपचार मिळत नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच पोलीस स्टेशनमध्ये आरोपी मेडिकल तपासणी साठी जबाबदारीने न्हावी , थोरगव्हाण, खिरोदा,यावल,रावेर येथील रुग्णालयात न्यावे लागते. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यास हकनाक मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे .तरी संबधितांनी रुग्णालयात त्वरित डाँक्टरची व अपूर्ण कर्मचारी नियुक्ती पूर्ण क्षमतेने करावी. गंभीर रुग्णास येथे झोपण्या साठी सुध्दा बेड नसल्याने उभे राहूनच उपचार करावे लागतात अशी परिस्थिती या रुग्णालयाची झाली आहे.
लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज...!
सावदा सह परिसरातील ३२ ग्राम खेडे यांचा सहवास लाभत असतो येथील ग्रामीण रुग्णालयात १२जाने २३ पासून (४६ दिवसा) पासून आज मिती पर्यंत डाँक्टर नसल्याने प्रतिदिनी गरजू, गरीब व सर्वसामान्य रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात मात्र येथे एक ते दीड महिन्या पासून डाँक्टर उपलब्ध होत नसल्याने व वरुग्णाची मोठी गैरसोय होत असल्याने या भागासाठी लाभलेल्या लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज आहे अशी रास्त मागणी होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत