Contact Banner

सावदा शिवसेनेतर्फे दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती होणार साजरी



 सावदा शिवसेनेतर्फे दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती होणार साजरी

लेवाजगत न्युज सावदा:- नुकतीच शहर शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) बैठक विश्रामगृह येथे पार पडली त्या बैठकीत शिवसेनेतर्फे दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी करण्याचे ठरले.बैठकीस मिलिंद पाटील, माजी नगरसेवक धनंजय चौधरी, श्याम पाटील शहर प्रमुख भरत नेहते,  शहर संघटक शरद भारंबे ,उपशहर प्रमुख गौरव भैरवा, अभिजीत मिटकर, इरफान खान ,महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख योगिता वायकोळे ,उपशहर प्रमुख निलेश खाचणे, अभिजीत मिटकर, चेतन माळी, माजी शहरप्रमुख राजेंद्र माळी,वामन भारंबे यांचा उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

   छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक सावदा शहर शिवसेना शाखेतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक १०/३/२०२३ (जन्मतिथीप्रमाणे ) श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवानिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी तमाम शिवभक्त व शिवप्रेमी जनतेने व सर्व शिवसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून मिरवणूकीमध्ये सहभागी होवून हा अलौकिक उत्सव साजरा करावा व आपला मराठी बाणा संघटीत करावा आणि उत्सव मिरवणुकीत सहभागी होवून हिंदूत्वाची शान वाढवावी. असे आवाहन श्री. छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे. मिरवणुकीची सुरुवात सोमवागिरी चौक (मढी) येथून संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.