उद्धव ठाकरे यांची मालेगावात आज सभा,उर्दूत लागले बॅनर.महाराष्ट्रात उर्दू वर बंदी आहे का संजय राऊत यांचा सवाल
उद्धव ठाकरे यांची मालेगावात आज सभा,उर्दूत लागले बॅनर.महाराष्ट्रात उर्दू वर बंदी आहे का संजय राऊत यांचा सवाल
मालेगाव न्यूज -उद्धव ठाकरे यांची 26 मार्चला मालेगावमध्ये सभा होणार आहे. याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या टीझरमध्ये 'बरे झाले गद्दार गेले आणि हिरे सापडले, जे काय बोलायचे ते मोकळ्या मैदानात बोलायचे'. असे म्हणत या टीझरमधून शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र मालेगावमध्ये उर्दूत लागले्या बॅनर्सची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
संजय राऊत हे दोन दिवसांपासून मालेगाव दौऱ्यावर आहे. सभेची जोरदार तयारी केली जात असून 1 लाखाहून अधिक नागरिक याठिकाणी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलेले मालेगावचे अद्वय हिरे यांच्याकडूनही जोरदार तयारी केली जात आहे. ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेले आहेत. सभेसाठी सर्वांना निमंत्रित केले जात आहे.
मात्र या सर्वांमध्ये लक्ष वेधून घेतले ते उर्दू भाषेत लागलेल्या बॅनर्सने. उद्धव ठाकरे यांच्या या सभेला जास्तीत जास्त मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहावे यासाठी ठाकरे गटाच्या वतीने उर्दूमध्ये बॅनर लावण्यात आले आहेत. मालेगावच्या चौकाचौकात सध्या हे बॅनर्स दिसत आहेत.
संजय राऊत यांनी मालेगावमध्ये जाऊन पहाणी केली होती. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर राऊत आणि भुसे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपचे राजकारण रंगल्याचे पहायला मिळाले. आता या बॅनर्सवरुन संजय राऊत यांनी सावध पवित्रा घेतला आहे.
महाराष्ट्रामध्ये आणि देशांमध्ये उर्दूवर काही बंदी आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. दादा भुसे यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्शवभूमीवर पालकमंत्री भुसे यांच्यावर संजय राऊत यांनी बिनबुडाचे आरोप करू नये असा इशारा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत