मधमाश्याच्या हल्ल्यात वरणगाव येथील नागेश्वर मंदिरात लग्न वऱ्हाडी जखमी
मधमाश्याच्या हल्ल्यात वरणगाव येथील नागेश्वर मंदिरात लग्न वऱ्हाडी जखमी
लेवाजगत न्यूज तळवेल -येथील बाळकृष्ण पुरुषोत्तम पाटील यांच्या मुलाचा विवाह दिनांक१७/०३/२०२३ रोजी वरणगाव येथील नागेश्वर मंदिर सप्तशृंगी माता मंदिर हॉल येथे संपन्न झाला. लग्न समारंभ प्रसंगी समारंभ सुरू होताना हॉलमध्ये असलेल्या लाल मधमाशा जवळपास पंधरा ते वीस वऱ्हाडी यांना जास्त प्रमाणात चावा घेतला. मधमाश्यांच्या हल्ल्या मध्ये सौ प्रमिला बाळकृष्ण झांबरे ओझरखेडा, सुभाष पुरुषोत्तम पाटील भुसावळ, सुमित राजेंद्र बढे पाली फोटोग्राफर, आकाश गजानन पाटील चांगदेव, योगेश पाटील कासारखेडा, भोजराज पाटील बेटावद यांना खूप जास्त प्रमाणात चावा घेतल्याने त्यांना उपचारार्थ खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
नागेश्वर मंदिरात दोन वर्षांपूर्वी तळवेल येथील संजय नारायण कापसे यांच्या मुलाच्या विवाह प्रसंगी सुद्धा अशी घटना घडलेली होती तरीसुद्धा संस्था चालकांनी कुठलीही दक्षता न घेतांना कार्यक्रम बुक करून देणे चालू ठेवले. वारंवार नागरिकांच्या जीवाशी खेळणे असे करू नये असे नागरिकांचे म्हणणे आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत