Contact Banner

दोन चोरट्यांना अटक चोरीच्या १२ दुचाकी सह अटक सावदा पोलीसांची कारवाई

दोन चोरट्यांना चोरीच्या १२ दुचाकी सह अटक   सावदा पोलीसांची कारवाई


 दोन चोरट्यांना चोरीच्या १२ दुचाकी सह अटक 

सावदा पोलीसांची कारवाई

लेवाजगत न्यूज सावदा - जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश येथून  वेगवेगळ्या भागातून चोरीला गेलेल्या दुचाकीसह दोन चोरट्यांना सावदा पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या १२ दुचाकी यावल व रावेर तालुक्यातील काही  गावातून हस्तगत केल्या आहेत.     

    याबाबत सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावदा परिसरातील  वेगवेगळ्या भागात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने अशाया गुन्ह्यातील चोरट्यांचा शोध घेण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दिल्या होत्या.त्यानुसार सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल  उमेश पाटील, विनोद पाटील, संजीव चौधरी, पोलीस नायक  मोहसीन खान पठाण, यशवंत टहाकळे, विनोद तडवी, पोलीस कोस्टबल  मनोज तडवी, चालक  नामदेव कापडे यांनी नाकाबंद केली. या नाकाबंदीच्या कारवाईत जावेद मुबारक तडवी रा. पातोंडा ता.जि. बुरहानपूर हा विना क्रमांकाची दुचाकी घेवून फिरत असल्याचे दिसून आले. पोलीसांनी दुचाकी अडवून त्याची चौकशी केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची कसून चौकशी केली असता सोबत असलेली दुचाकी ही सावदा पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली. त्याचप्रमाणे त्याने त्याचा साथीदार  मुनाफ मुबारक तडवी रा. कोळवद, ता. यावल याचे साथीने सावदा, रावेर, चोपडा, नेरी, ता. जामनेर, लालबाग ता.जि. बुरहानपुर, गणपतीनाका बुरहानपुर मध्यप्रदेश येथुन देखील मोटार सायकलींची चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने त्याचा साथीदार मुनाफ मुबारक तडवी रा. कोळवद, ता. यावल असे नाव सांगितले. पोलीसांनी दोघांना अटक केली. दोघांकडून आत्तापर्यंत १२ चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पुढील तपास सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालींदर पळे यांच्यामार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक  विनोद खांडबहाले, पोलीस हेड कोस्टबल उमेश पाटील, संजीव चौधरी, पोलीस नायक मोहसीन खान पठाण, विनोद तडवी व सहकारी करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.