Contact Banner

एकमेकांना आलिंगन देत रोमांच करीत शहरातून चालवली बाईक, पोलीस घेताय शोध

 

एकमेकांना आलिंगन देत रोमांच करीत शहरातून चालवली बाईक, पोलीस घेताय शोध

एकमेकांना आलिंगन देत रोमांच करीत शहरातून चालवली बाईक, पोलीस घेताय शोध 

वृत्तसंस्था जयपूर-पिंक सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानच्या जयपूरमधील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक तरुण-तरुणी दुचाकीवरून जाताना खुल्लम खुल्ला रोमान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ धुलिवंदनाच्या दिवशीचा असल्याचे सांगितले जात आहे.

      या दुचाकीच्या मागून जाणाऱ्या कारमधील एका व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. जयपूर शहरातील मुख्य रस्त्यावरून दुचाकीवर बसलेले तरुण या व्हिडिओत दिसते.

      यात सदरील तरुणी दुचाकीवर तरुणाच्या पुढे मागे तोंड करून बसलेली दिसते. तरुणाला घट्ट आलिंगन देऊन ही तरुणी दुचाकीवर बसलेली यात दिसते. हे दोघेही धुलिवंदनाच्या रंगात न्हाऊन निघाल्याचेही यात दिसते. भर दिवसा अशा अवस्थेत शहराच्या मुख्य रस्त्यांवरून दुचाकीने फिरणाऱ्या या जोडप्याकडे रस्त्यावरून ये-जा करणारा प्रत्येक जण आश्चर्याने बघत होता. अनेकांनी आपल्या कॅमेऱ्यात याचे व्हिडिओ शूट केले.

       याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी जोडप्याचा शोध सुरू केला आहे. दुचाकीच्या क्रमांकावरून या तरुण जोडप्याला पोलिस शोधत आहेत. दरम्यान, यावर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.