Contact Banner

११‎ महिन्यांपासून मोबदल्यापासून बचत गट वंचित

11-months-deprived-of-remuneration-savings-group-


 ११‎ महिन्यांपासून मोबदल्यापासून बचत गट वंचित 

लेवाजगत  न्यूज जळगाव -तालुक्यातील २००‎ अंगणवाड्यांमधील बालकांसाठी‎ पोषण आहार शिजवून पुरवणाऱ्या‎ ११० महिला बचत गटांचा ५६‎ लाखांचा माेबदला चुकीमुळे केंद्र‎ सरकारकडे परत गेला.

११‎ महिन्यांपासून मोबदल्यापासून वंचित‎ असल्याने महिला बचत गटांनी‎ कामगार दिनानंतर पोषण आहार‎ शिजवण्याचे काम बंद करण्याचा‎ इशारा येथील जिल्हाधिकाऱ्यांना‎ निवेदनाद्वारे दिला आहे.‎

जिल्हा परिषद अंतर्गत जळगाव‎ तालुक्यातील २०० अंगणवाड्यांतील‎ बालकांना पोषण आहार पुरवणाऱ्या‎ ११० महिला बचत गटांना‎ महिनाभरापूर्वी सरकारने ५६‎ लाखांचा मोबदला देवूनही त्यास‎ मुकावे लागले.

प्रिंट पेमेंट‎ अॅडव्हाइसवर १० दिवसांत‎ कार्यवाही न केल्याने ते रद्द झाले.‎ त्यामुळे मोबदला केंद्र शासनाच्या‎ खात्यात जमा झाला. तांत्रिक‎ चुकीनंतर हा मोबदला परत‎ मिळवण्यासाठी महिला व बाल‎ विकास आयुक्त, बँक व केंद्र‎ सरकारकडे पाठपुरावा करावा‎ लागतो आहे.

तालुक्यातील महिला‎ बचत गटांचे पीएफएमई प्रणालीवर‎ बाल विकास प्रकल्प अधिकारी‎ कार्यालयाला मार्च महिन्यात महिला‎ बचत गटांना मोबदला देण्यासाठी ५६‎ लाख रुपये प्राप्त झालेले होते. बाल‎ विकास प्रकल्प अधिकारी‎ कार्यालयाकडून हा मोबदला महिला‎ बचत गटांना देण्यासाठी‎ एचडीएफसी बंॅकेला प्रिंट पेमेंट‎ अॅव्हडाइस दिले होते. त्यावर दहा‎ दिवसात कार्यवाही न झाल्याने ते‎ पीपीए रद्द झाले. बाल विकास‎ प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या‎ खात्यावरही वर्ग झालेले नाहीत.

ती‎ रक्कम केंद्र सरकारच्या खात्यावर‎ वर्ग झाल्याचा अंदाज व्यक्त‎ करण्यात येत आहे. बचत गटांचा‎ अकरा महिन्यांपासून मोबदला‎ थकीत आहे. ३० एप्रिलपर्यंत‎ मोबदला न दिल्यास १ मेनंतर पोषण‎ आहार पुरवण्याचे काम बंद‎ करण्याचा इशारा बचत गटांनी दिला‎ असल्याचे अमृत महाजन यांनी‎ सांगितले. त्याबाबत महिला बचत‎ गटांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल‎ यांना मागणीचे निवेदन दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.