Contact Banner

भुसावळ रेल्वे विभागातील १७ गाड्या आज रद्द, पश्चिम बंगालमधील आंदोलनाचा परिणाम

 

भुसावळ रेल्वे विभागातील १७ गाड्या आज रद्द, पश्चिम बंगालमधील आंदोलनाचा परिणाम

  भुसावळ रेल्वे विभागातील १७ गाड्या आज रद्द, पश्चिम बंगालमधील आंदोलनाचा परिणाम

प्रतिनिधी भुसावळ -पश्चिम बंगालमधील कुर्मी समाजातर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनाचा फटका रेल्वे दळणवळणाला हावड्याकडून सुटणाऱ्या तब्बल ६० रेल्वे गाड्या शनिवार व रविवारी रद्द झाल्या आहेत. त्यात भुसावळकडे येणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्या शनिवारी (दि. ८) रद्द झाल्याने पुढील स्थानकावरील प्रवाशांची गैरसोय होईल. १७ पश्चिम बंगालमधील कुर्मी समाजाच्या आंदोलनामुळे हावडा

येथून सुटणाऱ्या ६० रेल्वे गाड्या प्रशासनाने रद्द केल्या आहेत. त्यात भुसावळकडे येणाऱ्या १७ गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. दरम्यान, हावडाकडून सुटणाऱ्या १७ गाड्यांच्या मार्गात बदल झाला आहे. त्यातील एकही गाडी भुसावळ विभागातून जाणारी नाही, असे सूत्रांनी सांगितले.

           या गाड्या झाल्या रद्द 

      शनिवारी व रविवारी (दि८व९ एप्रिल) पहिल्या स्थानकावरून सुटणाऱ्या आणि भुसावळ येथे दुसऱ्या दिवशी येणाऱ्या गाड्या रद्द झाल्या आहेत. यात एलटीटी- शालीमार एक्स्प्रेस, पुणे - हावडा, हावडा- पुणे, हावडा- पुणे दुरंतो एक्स्प्रेस, मुंबई -हावडा मेल, हावडा-मुंबई मेल, हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस, मुंबई -हावडा गीतांजली एक्स्प्रेस, हावडा -मुंबई गीतांजली एक्स्प्रेस, शालीमार -पोरबंदर, एलटीटी- शालीमार, शालीमार-एलटीटी, संत्रागाची-पुणे, कामाख्य-एलटीटी, एलटीटी-पुरी व पुरी-एलटीटीचा समावेश आहे.

 या बाबद सविस्तर माहिती करीत रेल्वे विभागात चौकशी करून घेणे.सततची अपडेट तिथे मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.