Header Ads

Header ADS

अश्लील रॅप साँग शूट केल्याचा आरोप करत अभाविपकडून पुणे विद्यापीठात तोडफोड, म्हणाले

 

अश्लील रॅप साँग शूट केल्याचा आरोप करत अभाविपकडून पुणे विद्यापीठात तोडफोड, म्हणाले

अश्लील रॅप साँग शूट केल्याचा आरोप करत अभाविपकडून पुणे विद्यापीठात तोडफोड, म्हणाले…

वृत्तसंस्था पुणे- विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक आंदोलन केलं. अभाविपने विद्यापीठात अश्लील रॅप साँगचं शूट झालं आणि त्यावर कुलगुरूंनी कारवाई केली नाही, असा आरोप केला आहे. विशेष म्हणजे आंदोलकांनी विद्यापीठात तोडफोड केल्याचंही समोर आलं आहे. यावर अभाविपच्या एका प्रतिनिधीने टीव्ही ९ मराठीशी बोलताना आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली.

     अभाविपने म्हटलं, “काही दिवसांपूर्वी या ठिकाणी रॅप साँगचं शुटिंग झालं. आम्हाला लाज वाटते की, आज त्याच खुर्चीवर कुलगुरू बसले आहेत. ज्यावेळी कुलगुरूंनी कारवाई करायला हवी होती तेव्हा त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. अद्याप दीक्षांत समारंभ झालेला नाही. ७० दिवस उलटून गेले विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेवर झालेली नाही.”

     अभाविपने आम्ही तोडफोड केलेली नाही, संवैधानिक मार्गाने आंदोलन केल्याचं म्हटलं. मात्र, प्रत्यक्षात बैठक सुरू असलेल्या सभागृहात दरवाच्या काचा फुटलेल्या आणि त्याचा खच सभागृहात पडलेलाही दिसतो आहे.

     दरम्यान, विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न विद्यापीठाने प्रलंबित ठेवल्याबाबत अभाविपने सोमवारी विद्यापीठात ट्रॅफिक जॅम आंदोलन केले. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या विद्यार्थ्यांचे न झालेले पदवी ग्रहण सोहळा आणि डिग्री सर्टिफिकेट न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे परदेशातील प्रवेश प्रलंबित आहेत. परीक्षांचे निकाल प्रलंबित राहण्याबरोबरच जाहीर झालेल्या निकालांमध्ये चुका आहेत. खाशाबा जाधव क्रीडा संकुलाचे उद्घाटन होऊनही क्रीडा विद्यार्थ्यांना वापरण्यास बंदी आहे. बीएस्सी-बीएडच्या विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेचा लाभ मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.