Header Ads

Header ADS

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलणारे क्षुद्र -ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे

Aurangabad-and-Osmanabad-changing-the-names-of-the-senior-literary-Bhalchandra Nemade


औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलणारे क्षुद्र -ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे 

वृत्तसंस्था पुणे-औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलणारे क्षुद्र लोक आहेत. त्यातून काही साध्य होणार नाही. यासह हडप्पा आणि मोहंजोदाडो संस्कृती जशी नष्ट झाली तशी आपल्या संस्कृतीच्या अंताची सुरुवात झाली असल्याची भीती नेमाडे यांनी व्यक्त केली. भारतात लोकशाही धोक्यात आली असून सत्य बोलणाऱ्याला पोलीस संरक्षणात फिरावे लागत असल्याचेही ते म्हणाले.

     ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांची सयाजी शिंदे आणि त्यांच्या सह्याद्री देवराई संस्थेमार्फत देशी बियाणांच्या माध्यमातून बीजतुला करण्यात आली. यावेळी ते एका वृत्तवाहीनीशी बोलत होते.

शहरांची नावे बदलण्याचा फायदा काय? 

     नेमाडे म्हणाले, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलणारे क्षुद्र लोक आहेत. त्यातून काही साध्य होणार नाही. औरंगाबादला पाणी द्या, तिथे चांगली झाडे लावा असेही त्यांनी म्हटले.

   रोखठोक भालचंद्र नेमाडे

● भारतात लोकशाही खरंच धोक्यात आली आहे.

• खरे बोलणाऱ्याला पोलीस संरक्षणात फिरावे लागत आहे. मला धमकीचे पत्र आल्याने मला त्रास झाला.

• प्रमाण मराठी भाषा असं काही नाही

• प्रत्येकाची भाषा तेवढीच प्रमाण आणि शुद्ध.

• इंग्रजांनी मराठी भाषेचा कोष करण्याचे काम चित्पावन ब्राम्हणांना दिले होते. त्यामुळेच ती प्रमाण भाषा पुण्यात मानली गेली.

• इंग्रजी शाळांमधून शिकणारी मुले पुढे काही बनू शकत नाहीत. त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो.

• राष्ट्र आणि धर्म संकल्पना नष्ट व्हाव्यात

उजव्यांमुळे देशीवाद धोक्यात.

   भालचंद्र नेमाडे म्हणाले की, देशीवाद हा जगभरात स्वीकारला गेला. 'एन्सायक्लोपीडिया'मध्ये देशीवाद हा शब्द आणि संकल्पना स्वीकारण्यात आली. ज्या मातीतून आपण उगवलो त्या मातीशी कृतज्ञ राहणं म्हणजे देशीवाद आहे. मोहंजोदाडो, हडप्पा संस्कृती नष्ट झाली तशी आपल्या संस्कृतीच्या अंताची सुरुवात झाली. झापडबंद पद्धतीने बदल स्वीकारले गेल्याने हे झाले. जगभरात उजव्या विचारसरणीमुळे देशीवाद धोक्यात आला आहे. भारतातील कम्युनिस्टांनी जात वास्तव नाकारले. त्याच्या परिणामी ते संपले.

    'हिंदू' कादंबरीतून पुढे काय?

भालचंद्र नेमाडे यांनी मुलाखतीत 'हिंदू' कादंबरीच्या आगामी कथानकाबाबतही स्पष्ट सांगितले. ते म्हणाले की, ''पुढील भागात खंडेराव हा पुरातत्व खात्यात नोकरी सुरु करतो. पुरातत्व संशोधन करत तो तक्षशीलेला पोहचतो. तेव्हा त्याला ग्रीस आणि युरोपातून इथे लोक शिक्षणासाठी येत असल्याचे जाणवते''

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.