Contact Banner

मोठे वाघोदा येथे रागातून तलवार हल्ला वडील व मुलगा जखमी,

Big-fight-out-of-anger- sword-attack-father-and-son-injured,-Crime-filed-against-one-in-Savada-Police-Station


 मोठे वाघोदा येथे  रागातून तलवार हल्ला वडील व मुलगा  जखमी,

सावदा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल

लेवाजगत न्यूज सावदा- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मोठ्या वाघोदा येथे सुप्रसिद्ध केळी व्यापारी डी के महाजन यांच्या घरामागील मोकळ्या जागेत युवराज उर्फ शांताराम आढाळे व रितिक आढाळे हे गप्पा गोष्टी करत बसले असता त्या ठिकाणी आरोपी नामे इमाम मुबारक तडवी हा दारू पिलेल्या अवस्थेत आला असता त्यांनी येथील महेंद्र चौधरी(बढे) याची टिंगल टवाळी केली.यामुळे वाद विकोपाला जात असताना सदरील आरोपीस फिर्यादी शांताराम उर्फ युवराज आढाळे यांनी हटकले असता आरोपी तेथून निघून गेल्यानंतर काहीच वेळात हातात लोखंडी तलवार घेऊन पुन्हा फिर्यादी जवळ आला व थांब शांताराम तू लय मातला आहे तुला आता मी पाहतो असे म्हणूत सोबत आणलेल्या लोखंडी तलवारीने अचानक शांताराम आढाळे यांच्यावर अचानकपणे वार केला तलवारीचा वार चुकवीला असताना त्याच्या उजव्या हाताच्या पंजावर वार लागला असून पुन्हा आरोपी इमाम मुबारक तडवी यांनी तलवारीने वार केला यात शांताराम आढळे याचे डाव्या डोळ्यावर कपाळावर वार केले यात फिर्यादीसह त्याचा मुलगा ऋतिक आढाळे हे गंभीर जखमी झाले.तरी उपचारासाठी यांना जळगाव येथे हलवण्यात आले आहे.यावादात रितिक आढाळे देखील जखमी झाला. यानंतर जखमी शांताराम आढाळे यांनी फिर्याद दिल्यानंतर सावदा पोलीस ठाण्यात गुरनं.७२/२०२३ भादवीचे कलम ३०७,३२३,५०४,५०६, शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४,२५ अन्वे इमाम मुबारक तडवी राहणार मोठा वाघोदा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास एपीआय जालिंदर पडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अन्वर तळवी करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.