धोनीचा चिमुकलीसोबत खास संवाद, हैदराबादचा गोलंदाज नटराजनच्या मुलीसोबतचा क्यूट व्हिडीओ व्हायरल
IPL NEWS:- धोनीचा चिमुकलीसोबत खास संवाद, हैदराबादचा गोलंदाज नटराजनच्या मुलीसोबतचा क्यूट व्हिडीओ व्हायरल
लेवाजगत न्युज IPL:-मध्ये चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघावर सात विकेट्सने विजय मिळवला. कर्णधार धोनीच्या चेहऱ्यावर चेन्नई संघाच्या विजयानंतरचा आनंद स्पष्ट दिसत होता. या सामन्यानंतर धोनीने चेन्नई संघासोबत हैदराबाद संघाच्या खेळाडूंचीही भेट घेत, त्यांच्यासोबत संवाद साधला. हैदराबाद संघातील तरुण खेळाडूंना धोनीनं प्रोत्साहन दिलं. याशिवाय धोनीनं एका चिमुकलीसोबतही खास संवाद साधला. याचा क्यूट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपर किंग्स (CSK) कर्णधार महेंद्र सिंह धोनीने शुक्रवारी, 21 एप्रिलला सामना संपल्यानंतर हैदराबाद संघातील खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. धोनीने सनरायझर्स हैदराबाद (SRH) वेगवान गोलंदाज थंगारासू नटराजन यांच्या मुलीसोबत संवाद साधला. दोघांच्या भेटी दरम्यानचा खास व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी नटराजनच्या मुलीसोबत मजेशीर संवाद साधताना आणि खेळताना दिसत आहे.
चेन्नईच्या घरच्या मैदानावर म्हणजे एमए चिदंबरम स्टेडियमवर (Chepauk Stadium) पार पडलेल्या सामन्यात चेन्नईने सात गडी राखून दमदार विजय मिळवला. हैदराबादच्या संघाने नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी केली आणि 20 षटकात सात गडी बाद 134 धावा केल्या. चेन्नईच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांची नाच्चकी केली आणि शानदार विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यासाठी नटराजनला सनरायझर्स हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नव्हती. पण सामना संपल्यानंतर नटराजनने धोनीची भेट घेतली. यावेळी नटराजनची पत्नी आणि मुलगीही त्याच्यासोबत होती. धोनीनं नटराजनच्या मुलीसोबत गोड संवाद साधला. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
चेन्नईचा हैदराबादवर सात विकेटने विजय
रविंद्र जाडेजाचा भेदक मारा आणि डेवॉन कॉनवेच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने हैदराबदचा सात विकेटने पराभव केला. हैदराबादने दिलेले 135 धावांचे आव्हान चेन्नईने सात विकेट आणि आठ चेंडू राखून पार केले. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने 18.4 षटकांत 3 विकेट्स राखून हा सामना जिंकला. चेन्नई सुपर किंग्सच्या विजयाचा हिरो सलामीवीर डेवॉन कॉनवे ठरला. चेन्नईकडून डेवॉन कॉनवे याने नाबाद 77 धावांची खेळी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत