घरगुती भांडणातून पत्नीची आठ बोटे कापली पश्चाताप झाल्यावर पतीची आत्महत्या
घरगुती भांडणातून पत्नीची आठ बोटे कापली पश्चाताप झाल्यावर पतीची आत्महत्या
मालेगाव -सोनज येथील बुधा जगन्नाथ शिसव (३७) व शीलाबाई बुधा शिसव या मजुरी करणाऱ्या दांपत्यात झालेल्या कौटुंबिक वादाच्या संतापात पती बुधा याने पत्नी शीलाबाई हिच्या दोन्ही हातांची आठ बोटे छाटली. या घटनेचा पश्चात्ताप झाल्यानंतर त्यानेही आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली.
सोनज येथील पारधी समाजाचे शिसव दांपत्य मोलमजुरी करून उपजीविका भागवत होते. दि. १० एप्रिल रोजी रात्री त्यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारी ३ वाजता त्याच कारणावरून वाद वाढला व भांडणाचे पर्यवसान झटापटीत झाल्याने पती बुधा शिसव याने रागाच्या भरात पत्नी शिलाबाई यांच्यावर शेती कामातील विळा उगारला. त्यामुळे बचावासाठी त्यांनी दोघे हात पुढे केले व विळा दोन्ही हातांनी घट्ट पकडून ठेवला.परंतु रागात असलेल्या बुधा यांनी तो विळा जोरात ओढला. त्यामुळे पत्नी शिलाबाई यांच्या दोन्ही हातांच्या आठ बोटांची तुकडे पडले. या वेळी आरडाआरेडा ऐकून शेजारी गोळा झाले व त्यांनी तात्काळ जखमी शिलाबाई यांना मालेगाव येथे उपचारासाठी दाखल केले. रक्त,पत्नीचे कापलेले बोटे पाहून बुधा शिसव प्रचंड घाबरला. घटनेच्या दोन दिवसांनंतर त्याने राहत्या घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत