ब्रेकिंग! खिरोद्यामध्ये लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात
ब्रेकिंग! खिरोद्यामध्ये लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात
लेवाजगत न्यूज खिरोदा- रावेर तालुक्यातील खिरोदा येथील तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे, व कोतवाल शांताराम यादव कोळी, या दोघाना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने चार हजार रुपयांची लाच घेताना आज दि ६ एप्रिल रोजी रंगेहात पकडले. या बाबत अधिक माहिती अशी की, वडीलोपार्जीत शेती रावेर तालुक्यातील खिरोदा तलाठी कार्यालयाचे हद्दीमध्ये असून तक्रारदार यांचे मोठे भाऊ मयत झालेले असल्याने सदर शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर मयत भावाची पत्नी व मुलगा यांचे नावे वारस म्हणून नोंद घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष तलाठी प्रमोद प्रल्हाद न्हायदे, व कोतवाल शांताराम यादव कोळी, यांनी ४,०००/रु. लाचेची मागणी केली. सदर मागणी केलेली लाच रक्कम तलाठी न्हायदे व कोतवाल कोळी यांनी स्वतः सजा खिरोदा तलाठी कार्यालय खिरोदा ता. रावेर, जि. जळगाव . येथे स्वीकारली. म्हणून प्रमोद प्रल्हाद न्हायदे, वय - ४५ वर्ष, तलाठी, सजा खिरोदा तलाठी कार्यालय ता. रावेर जि. जळगाव. (वर्ग-३) रा. गणेश कॉलनी, फैजपुर ता. यावल जि. जळगाव. आणि शांताराम यादव कोळी, वय ५२ वर्ष, कोतवाल, सजा खिरोदा तलाठी कार्यालय ता. रावेर जि.जळगाव. (वर्ग-४) रा. खिरोदा, ता. यावल जि. जळगाव. या दोन्ही आरोपीतां विरुद्ध सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. ही घटना आज ६ एप्रिल रोजी घडली. सापळा पथकात शशिकांत पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगांव एस. के. बच्छाव, पोलिस निरीक्षक, ला.प्र.वि. जळगांव. पो.ना.ईश्वर धनगर, पो. कॉ. राकेश दुसाने यांनी कामगिरी बजावली .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत