Contact Banner

सावद्यात सामाजिक सलोख्याचे दर्शन मुस्लिम बांधवांकडून श्री हनुमान जयंतीच्या मिरवणुकीचे उत्स्फूर्त स्वागत

सावद्यात सामाजिक सलोख्याचे दर्शन मुस्लिम बांधवांकडून श्री हनुमान जयंतीच्या मिरवणुकीचे उत्स्फूर्त स्वागत


 सावद्यात सामाजिक सलोख्याचे दर्शन मुस्लिम बांधवांकडून श्री हनुमान जयंतीच्या मिरवणुकीचे उत्स्फूर्त स्वागत

लेवाजगत न्यूज सावदा-श्री हनुमान जयंतीच्या मिरवणूकीदरम्यान शहरात  सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले.  मिरवणूक चाँदनी चौकात आल्यानंतर मुस्लिम बांधवांनी स्वागत केले.

    सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे. त्यामुळे बड़ा आखाडा मशिदीत प्रार्थना सुरु असल्यास डीजे बंद करून मिरवणूक पुढे नेण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला होता. म्हणून मुस्लिम बांधवांनीदेखील मिरवणुकीत हिंदू बांधवांना पुष्पगुच्छ व पुष्पमाला  देवुन हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यापुढेही शहरात अशाप्रकारे सलोखा कायम राखला जाईल,  अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नयन अत्तरदे, उपाध्यक्ष हेमंत चौधरी, सचिव तुषार बोंडे, कौशल धांडे, अक्षय सरोदे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक प्रतिक भिडे, जिल्हा गो-रक्षा प्रमुख चंदन इंगळे, पप्पू जोगी, भैय्या चौधरी यांचे शेख फरीद शेख नुरोद्दीन यांनी पुष्पगुच्छ देवून तसेच युसूफ शाह सुपडू शाह व रशीद बिस्मिल्ला बागवान, शेख इरफान मिया यांच्यासह मुस्लिम बांधवांनी स्वागत केले. अशाप्रकारे हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे, उपनिरीक्षक विनोद खांडबहाले व फिरोज खान पठाण उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.