Contact Banner

सावद्यात ७६ वर्षाच्या वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

 

 सावद्यात ७६ वर्षाच्या वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

लेवाजगत न्युज सावदा:-  सावदा येथील ७६ वर्षीय वृध्द रहिवाशी व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

    अधिक माहिती अशी की, सावदा (ता. रावेर) येथील तेली वाडा परिसरातील  रहिवासी उखर्जू लालू सरोदे (वय-७६) वर्ष असे मृत वृध्दाचे नाव असून यांनी आपल्या राहत्या घरात दि.१२ एप्रिल च्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.मृतदेहाचा पंचनामा करून सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात मुलगा, ३ मुली, सुन आणि नातवंडे असा परिवार आहे.ते सुधीर सरोदे यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.