शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे २३ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे २३ रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर
लेवाजगत न्यूज पाचोरा -शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे २३एप्रिल रोजी जळगांव जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
जिल्हातील पाचोरा येथे स्वर्गीय मा.आ.स्व.तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांच्या स्मारकाच्या अनावरण,मायकोरायझा लॅब उद्घाटन त्यांचे हस्ते होणार आहे.यावेळी जाहीर सभेचे हि आयोजन करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या नियोजन करण्यासाठी १५ व १६ एप्रिल रोजी शिवसेना जळगांव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत जळगांव व पाचोरा येथे येत आहे. हा दौरा यशस्वी करण्यासाठी जळगांव जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यांनी आता पासूनच मेहनत घेऊन जास्तीत जास्त सभा मोठी होण्यासाठी कंबर कसली आहे, अशी माहिती शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख डॉ हर्षल माने, विष्णू भंगाळे, दिपक राजपूत, समाधान महाजन, महानंदा पाटील व निर्मल सिड्चे संचालिका सौ.वैशालीताई पाटील- सूर्यवंशी, महापौर सौ. जयश्री महाजन, महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, विस्तारक चैतन्य बनसोडे, युवासेना जिल्हायुवाधिकारी निलेश चौधरी, चंद्रकांत शर्मा, पियुष गांधी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत