स्वामिनारायण मंदिरात अक्षय तृतीयेनिमित्त सामूहिक घागर भरणी कार्यक्रम
स्वामिनारायण मंदिरात अक्षय तृतीयेला सामूहिक घागर भरणी कार्यक्रम
लेवाजगत न्यूज सावदा -अक्षय्य तृतीयेनिमित्त श्री स्वामीनारायण मंदिरात सामूहिक घागर भरण्याचा कार्यक्रम २२ रोज शनिवार रोजी आयोजित केला आहे. साडेतीन मुहूतांपैकी एक मुहूर्त अक्षय्य तृतीयेच्या सणाला दानधर्माचे विशेष महत्व आहे. या काळात धन, जमीन, दान करुन पुण्यसंचय करण्यास प्राधान्य दिले जाते. आपल्या रूढीप्रमाणे पूर्वजांच्या आठवणीत अक्षय्य तृतीयेला घागरीत पाणी भरून दान केले जाते. त्यासाठी स्वामीनारायण मंदिरात सामूहिक घागर भरण्याचा कार्यक्रम आणि यज्ञ कर्माचे आयोजन करण्यात आले आहे, असे मंदिराचे कोठारी शास्त्री भक्तीकिशोरदास यांनी सांगितले आहे. या कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
सावदा येथे सामूहिक घागर भरणी कार्यक्रम,अक्षय तृतीयेला स्वामीनारायण मंदिर येथे .अक्षय तृतीयेचे महत्व काय- कोठारी स्वामी भक्ती किशोर दाजी स्वामीनारायण मंदिर सावदा
मंदिरात असलेल्या देवदेवतांना अक्षय्य तृतीयेपासून एक महिना चंदनाचे लेपन शृंगार दररोज करण्यात येईल. त्यात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत