Header Ads

Header ADS

वीज मीटर जोडणीसाठी घेतली दीड हजाराची लाच घेताना टेक्नीशीयनसह खासगी पंटरला रंगेहात पकडले

Vīja-mīṭara-jōḍaṇīsāṭhī-ghētala-dīḍa-hajārācī-lāca-ghētānā- ṭēknīśīyanasaha-khāsagī-paṇṭaralā- raṅgēhāta-pakaḍalē

  

वीज मीटर जोडणीसाठी घेतली दीड हजाराची लाच घेताना टेक्नीशीयनसह खासगी पंटरला रंगेहात पकडले

लेवाजगत न्यूज जामनेर- तालुक्यातील फत्तेपूर येथे वीज मीटर लावून देण्यासाठी दीड हजार रूपयांची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या टेक्नीशीयनसह खासगी पंटरला जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने वीज कंपनीच्या आवाराहत रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे महावितरण कंपनी विभागात खळबळ उडाली आहे. 

    याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील रहिवाशी असून त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये वीज मीटर घेण्यासाठी महावितरण कंपनीत अर्ज केला होता. त्यानुसार सिनीअर टेक्नीशीयन विनोद उत्तम पवार आणि खासगी पंटर कलीम तडवी यांनी दोन हजार रूपये डिमांड नोट भरण्यासाठी घेतले होते. तरी देखील वीज मीटर लावलेले नव्हते. मात्र आता पुन्हा वीज मीटर लावून देण्यासाठी दीड हजाराची लाच मागितली. त्यानुसार तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणीसाठी लाचलुचपत विभागाने बुधवारी १९ एप्रिल रोजी दुपारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात सापळा रचला. त्यानुसार सिनीअर टेक्नीशीयन विनोद उत्तम पवार आणि खासगी पंटर कलीम तडवी तक्रारदारकडून दीड हजाराची लाच घेतांना पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महावितरण कंपनी विभागात मोठी खळबळ उडाली आहे. हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.