Contact Banner

बालिकेचा वाढदिवसालाच कुलरचा शॉक लागून मृत्यू

Girl-birthday-same-death-from-cooler-shock


बालिकेचा वाढदिवसालाच कुलरचा शॉक लागून मृत्यू  

 लेवाजगत न्यूज मुक्ताईनगर -मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील जिजाऊ नगरमध्ये १९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास नवव्या वर्षाची वाढदिवसाची तयारी  सुरू असताना कुलरचा शॉक बसल्याने  बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 ९ वा वाढदिवस असल्याने सायंकाळी सर्व कुटुंबीय बालिकेचा वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करीत असताना शुक्रवारी वैष्णवी चेतन सनान्से या मुलीस शॉक लागून तिचा मृत्यू झाला. ती गोपाळ बळीराम सनान्से (रा चिंचोल, ह. मु. मुक्ताईनगर)यांची नात होती. ती ओम साई सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष सनान्से यांची पुतणी तर चेतन महाराज ( अंत्यविधी, भजनी मंडळ) यांची कन्या दरम्यान, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रत्येकाच्या घरी कुलर लावण्यात आले आहे. मात्र अनेकदा कुलरमध्ये विजेचा प्रवाहन उतरण्याची भिती असते. त्यामुळे नागरिकांनी घरात कुलर लावताना त्यांची व्यवस्थित तपासणी करून घेतल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो. म्हणून नागरिकांनी यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.