Contact Banner

नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलावर दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी

 

Nashirabad-Railway-over-flyover-two-wheeler-accident-one-death-district-hospital-crowd-of-relatives

नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलावर दुचाकी अपघातात  एकाचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी 

लेवाजगत न्यूज नशिराबाद  उड्डाण पुलाजवळ दुचाकी अपघातात मेहरूण येथील प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली असून याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. दिलीप विश्वनाथ देवरे (वय ५७) रा. मेहरूण, रामेश्वर कॉलनी, जळगाव असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील , रामेश्वर कॉलनीतील मेहरूण येथे दिलीप देवरे हे आई, पत्नी व मुलासोबत वास्तव्याला होते. फर्निचरचे कामकरून ते आपला उदरनिर्वाह करत होते. मंगळवारी २ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ते जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ दुचाकीने येत असतांना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. अपघात कसा घडला याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. दरम्यान, स्थानिक नागरीकांनी जिल्हा शासकीय वैद्यकी महाविद्यालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी मृत घोषीत केले. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. त्याच्या पश्चात आई कमलबाई, पत्नी जयाबाई, मुलगा गणेश आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.