Contact Banner

सावदा व यावल येथे मोफत दवाखाने सुरू

 

सावदा व यावल येथे मोफत दवाखाने सुरू

सावदा व यावल येथे मोफत दवाखाने सुरू

लेवाजगत न्यूज सावदा-महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे यावल आणि सावदा येते 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरू दवाखान्यातून गरजूंना मोफत करण्यात आला. यात मोफत आरोग्यसेवा देण्यात येईल. 

सावदा येथील साळी बाग परिसरातील दवाखान्याचे उद्घाटन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. मुख्याधिकारी किशोर चव्हाण, माजी नगरसेवक फिरोज खान पठाण, फिरोज खान, शिवसेना शहरप्रमुख सूरज परदेशी, मनीष भंगाळे, तालुका आरोग्य अधिकारी झोपे उपस्थित होते. या दवाखान्याच्या माध्यमातून गरजूंना मोफत आरोग्यविषयक सुविधा पुरवण्यात येतील

     यावल येथील स्वामी समर्थ नगरातील दवाखान्याचे उद्घाटन हिंगणा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज तडवी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. अमोल रावते, डॉ. राहुल गजरे, डॉ. अर्चना पाचपोळे, जयंत पाटील, नरेंद्र तायडे, आशिष शिंदे, प्रतिभा ठाकूर, शकील तडवी, अश्विनी जाधव, राजनंदणी पाटील उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.