Contact Banner

श्री क्षेत्र पंचायतन मंदिराच्या वर्धापन दिनी धार्मिक कार्यक्रम

श्री क्षेत्र पंचायतन मंदिराच्या वर्धापन दिनी धार्मिक कार्यक्रम


 श्री क्षेत्र पंचायतन मंदिराच्या वर्धापन दिनी धार्मिक कार्यक्रम

उरण (सुनिल ठाकूर लेवाजगत जगत प्रतिनिधी )श्री क्षेत्र पंचायतन मंदिराचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. 'पनवेल'चे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी खालापूर तालुक्यात नढाळ येथे श्री गणेश, श्री साई बाबा, मारुती, भगवान श्री शंकर शिवलिंग आणि आई भवानी माता मंदिराची स्थापना केली आहे. मंदिराच्या स्वागत कमानीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. या मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

पनवेल उरण, नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील भाविकांनी धार्मिक कार्यक्रम, दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिर म्हणजे धार्मिक लोक आणि भक्तांचे श्रध्दास्थान असून धार्मिक पर्यटन स्थळ झाले आहे. दररोज या ठिकाणी अनेक भक्तगण दर्शनाला येत असतात, तर येथील असलेल्या सुंदर बागेत अनेक लहान मुले खेळण्याचा आनंद लुटत असतात. सदर ठिकाण परिसरातील प्रेक्षणीय स्थळ म्हणून परिचित झाले आहे.

    मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्याचाही लाभ अनेकांनी घेतला. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे श्री गजानन महाराजांच्या पादुका दर्शनासाठी ऊपलब्ध झाल्याने अनेकांनी पादुकांचे दर्शन घेतले. तर संगीत भजनांचा आनंद देखील अनेकांनी घेतला. दरम्यान, जे. एम. म्हात्रे आणि प्रितम म्हात्रे आवर्जुन सर्वांचे स्वागत करीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.