Header Ads

Header ADS

सम विषम तारीख अन स्त्रीसंग,इंदोरीकर महाराजांना लिंग भेदाचे कीर्तन भोवले

 

Even-Odd-Date-Un-Strisang,-Indorikar-Maharaja-Bhoveled-Kirtan-of-Gender-Distinction

सम विषम तारीख अन स्त्रीसंग,इंदोरीकर महाराजांना लिंग भेदाचे कीर्तन भोवले 

वृत्त संस्था मुंबई-. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने लिंगभेदावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कीर्तनकार इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. कोर्टाच्या या आदेशामुळे इंदुरीकरांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे.

सम विषम तारीख अन स्त्रीसंग,इंदोरीकर महाराजांना लिंग भेदाचे कीर्तन भोवले


    इंदुरीकर महाराजांनी काही महिन्यांपूर्वी लिंगभेदावर वादग्रस्त भाष्य केले होते. 'सम-विषम तारखेला शरीर संबंध प्रस्थापित केल्यास मुलगा व मुलगी होते,' असा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या विधानावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने हरकत घेतली होती. तसेच या प्रकरणी औरंगाबाद कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात महाराजांनी सेशन कोर्टात याचिका दाखल केली होती. सेशन कोर्टाने त्यांच्यावरील गुन्हा रद्दबातल करत त्यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेले. तिथे इंदुरीकरांना मोठा धक्का बसला.

    याचिकाकर्त्याचे वकील जितेंद्र पाटील यांनी सांगितले की, इंदुरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो व विषम तिथीला केल्यास मुलगी होते असा दावा केला होता. त्यांचे हे विधान गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात होती. त्यातून PCPNDT कायदा कलम२२ चे उल्लंघन झाले होते. या प्रकरणी PCPNDT सल्लागार समितीने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना नोटीस बजावून स्पष्टीकरणही मागितले होते. या प्रकरणी इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रथम वर्ग न्यायालयात १५६ (३) याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने या याचिकेवर सुनावणी करताना इंदुरीकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पण सत्र न्यायालयाने हे आदेश रद्दबातल केले.

त्यानंतर या आदेशांना औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले. खंडपीठाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सत्र न्यायालयाचा आदेश रद्दबातल करत प्रथम वर्ग न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

   इंदुरीकर महाराज हे मिश्किल, विनोदी व उपरोधिक शैलीत कीर्तन करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी शिर्डीतील आपल्या कीर्तनात लिंगभेदावर भाष्य केले होते. सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो, तर विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होते, असे ते म्हणाले होते. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यांच्या या विधानावर जिल्हा आरोग्य विभागाने इंदुरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी स्पष्टीकरणही दिले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.