Header Ads

Header ADS

जिल्ह्यातील अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतूक रोखणेसाठी जिल्हास्तरीय विविध विभागांचे समन्वयातून पथकांची निर्मिती


 जिल्ह्यातील अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतूक रोखणेसाठी जिल्हास्तरीय विविध विभागांचे समन्वयातून पथकांची निर्मिती

लेवाजगत न्युज जळगाव:-जळगाव जिल्ह्यातील अवैध गौणखनिज उत्खनन, वाहतूक रोखणेसाठी जिल्हास्तरीय विविध विभागांचे समन्वयातून पथकांची निर्मिती करणेत आलेली आहे. सर्व आवश्यक उपाययोजना करुन जिल्ह्यातील अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व आवश्यक ते प्रयत्न करणेत येत आहे.


अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीची माहिती सजग नागरिकांकडुन जिल्हा


प्रशासनाला मिळाल्यास अधिक परिणामकारक कारवाई करणे शक्य होईल. जनतेचे अधिकाधिक सहकार्य मिळवून अवैध गौणखनिजाचे साठा, उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंध करणेचा जिल्हा प्रशासनाचा मानस आहे.


नागरिकांना अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीबाबत माहिती जिल्हा प्रशासनाला कळविणेसाठी नागरिकांना ९२०९२८४०१० हा हेल्पलाईन क्रमांक जिल्हा प्रशासनाद्वारे उपलब्ध करुन देणेत येत आहे. नागरिकांनी ९२०९२८४०१० या हेल्पलाईन क्रमांकावर अवैध गौणखनिज साठा, उत्खनन व वाहतुकीबाबत बाबत व्हॉटसअप द्वारे घटनेचे छायाचित्र / चलचित्रफित (फोटो/व्हिडीओ). घटनेचे ठिकाण, गुगल लोकेशन कळविणेचे आवाहन करणेत येत आहे. प्राप्त तक्रारीबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावरुन तात्काळ कारवाई करण्यात येईल.


अवैध गौण खनिजाबाबत तक्रार करणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनिय ठेवणेत येईल, तरी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमाला सहकार्य करणेचे आवाहन करणेत येत आहे.असे आवाहन अमन मित्तल जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जळगाव यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.