Header Ads

Header ADS

परप्रांतीयांमुळे मुंबईतील नाले तुंबतात! राज ठाकरे यांचा आरोप

Paraprāntīyāmmuḷē-mumba'ītīla-nālē-tumbatāta!-Rāja-ṭhākarē- yān̄cā-ārōpa


 परप्रांतीयांमुळे मुंबईतील नाले तुंबतात! राज ठाकरे यांचा आरोप

वृत्तसंस्था मुंबई: एखाद्या राज्यात बाहेरच्या लोकांनी किती प्रमाणात यावे आणि असलेली व्यवस्था किती बिघडवावी याला काही मर्यादा असतात. राज्याबाहेरील लोकांनी मोठय़ा प्रमाणात नाल्यांवर बांधलेल्या झोपडय़ा, केलेली अतिक्रमणे आणि मतांसाठी त्यांना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी यामुळेच मुंबईतील नाले पावसाळयात तुंबत असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी केला.

Paraprāntīyāmmuḷē-mumba'ītīla-nālē-tumbatāta!-Rāja-ṭhākarē- yān̄cā-ārōpa


    प्रत्येक संकटात लोकांच्या मदतीला मनसे धावते, मात्र मतदान पिळवणूक करणाऱ्यांनाच होते अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. मनसेच्या आपत्कालीन व्यवस्थापन पथकाच्या मेळाव्याला राज यांनी मार्गदर्शन केले. पक्षाची स्थापना करताना इतर पक्षांनी जे केले नाही ते आपल्याकडे असले पाहिजे, म्हणूनच नवनिर्माण हा शब्द वापरला. आणि त्यामुळेच पक्षाच्या वेगवेगळया शाखा तसेच आपत्कालीन व्यवस्थापन पथक स्थापन केले, असे प्रारंभीच स्पष्ट करून ठाकरे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीत मुंबईतील अग्निशमन दलाचे जवान, पोलीस कोणत्या परिस्थितीत काम करत असतात आपण पाहिले पाहिजे. पण त्यांचे ज्या प्रमाणात कौतुक व्हायला पाहिजे तितक्या प्रमाणात होत नसल्याची खंतही त्यानी व्यक्त केली.

   जगभरात आपत्कालीन घटना हाताळण्यासाठी सक्षम यंत्रणा, व्यवस्थापन असते. आपल्याकडे मात्र अहमदाबादला पाऊस पडल्यावर क्रिकेट सामन्यासाठी मैदान सुकवण्यासाठी दोन दिवस कसरत करावी लागली. म्हणूनच आपत्कालीन परिस्थितीत लोकांना मदत करण्यासाठी अशा प्रकारच्या शाखा उभ्या केल्याचे स्पष्ट केले.  बाहेरच्या राज्यातील लोकांनी नाल्यांवर झोपडय़ा बांधल्यामुळे मुंबईतील नाले तुंबत आहेत, असा आरोप राज यांनी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.