Header Ads

Header ADS

फळबाग लागवड योजनेसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

Phaḷabāga-lāgavaḍa-yōjanēsāṭhī-icchuka-śētakaṟyānnī-arja-karaṇyācē-āvāhana

फळबाग लागवड योजनेसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

लेवाजगत न्यूज जळगाव, दि. 24- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२३-२४ अंतर्गत जिल्ह्यास एकूण २५०० हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे लक्षांक प्राप्त झाले आहे. या योजनेत फळबाग लागवड व फुलपिके लागवडीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेतर्गत कमीत कमी ०.०५ हेक्टर ते जास्तीत जास्त २.०० हेक्टर क्षेत्रावर इच्छुक लाभार्थ्यांना लागवडीचा लाभ देण्यात येत असून अनु. जाती, अनु. जमाती, भटक्या जमाती, निरधी सूचित जामती, दारिद्रय रेषेखालील कुटुंब, स्त्री कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब, जमीन सुधारणाचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेतंर्गत लाभार्थी, अनु. जमातीचे व इतर पारंपारीक वनवासी अधिनियम २००६ मधील पात्र लाभार्थी, इत्यादी लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. या योजनेतंर्गत केळी पिकाचा समावेश झालेला असल्याने त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

Phaḷabāga-lāgavaḍa-yōjanēsāṭhī-icchuka-śētakaṟyānnī-arja-karaṇyācē-āvāhana


या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक पात्र लाभार्थी शेतकन्यांकडे ७/१२ उतारा, ८-अ उतारा, मजुर कार्ड (जॉबकार्ड), इत्यादी कागदपत्रे तसेच ग्रामपंचायतीने मान्य केलेली लाभार्थी यादीत नाव असणे व प्रपत्र अ व प्रपत्र व फळबागेचे कार्य ग्रामपंचायत किंवा कृषि विभाग यापैकी कोणाकडून राबविण्यात रस आहे याचा स्पष्ट उल्लेख असावा) सादर करणे बंधनकारक आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण फळबाग लागवड योजनेतर्गत केळी, आंबा, चिकू, पेरू, बोर, सिताफळ, कागदी लिंबू, डाळींब, आवळा, सिताफळ, मोसंबी, इत्यादी फळपिके व गुलाब, मोगरा, निशीगंध, सोनचाफा, इत्यादी फुलपिके लागवडीचा लाभ देण्यात येतो. तरी योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक पात्र लाभार्थ्यांने विहीत नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ) व संमती पत्र (प्रपत्र-ब) ऑफलाईन पद्धतीने आपल्या गावातील ग्रामपंचायत किंवा संबंधित कृषि सहाय्यक/तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेकडे सादर करावा.

तसेच जे लाभार्थी शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण फळबाग लागवड योजनेतंर्गत पात्र ठरत नाहीत, ज्याचे क्षेत्र २.०० हेक्टर पेक्षा जास्त आहे, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरू केलेली आहे. सदर योजनेतंर्गत पात्र वैयक्तिक शेतकऱ्यांना कमीत कमी ०.२० हेक्टर ते जास्तीत जास्त ६.०० हेक्टर क्षेत्र मर्यादा अनुदान देय राहील. सदर योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक पात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडे ७/१२ उतारा, ८-अ उतारा असणे आवश्यक आहे. या योजनेतंर्गत आंबा, पेरू, डाळींब, कागदी लिंबू, मोसंबी, संत्रा, सिताफळ, आवळा, चिंच, चिकू, जांभूळ इत्यादी फळपिके लागवडीसाठी अनुदान देय असून इच्छुक अर्जदार शेतकऱ्यांनी या https://mahadbt.maharashtra.gov.in

https://mahadbt.maharashtra.gov.in पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन श्री. ठाकूर यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.