Header Ads

Header ADS

रावेर आगारातील वीजप्रवाह बंद अभावी एसटी गाड्या अनियमित,काही रद्द

Raver-Agara-electricity-shutdown-due-to-state-transport-corporation-bus-trains-irregular,-some-cancelled


 रावेर आगारातील वीजप्रवाह बंद अभावी एसटी गाड्या अनियमित,काही रद्द 

 लेवाजगत न्यूज सावदा - येथून दररोज कल्याण,नासिक औरंगाबाद,सुरत,ठाणे तुळजापूर, बारामती,भुसावळ,जळगाव अशा बस गाड्या जात असतात या बसच्या माध्यमातून शेकडो प्रवासी सावदा बस स्थानकातून प्रवास करीत असतात. रावेर आगाराचा विज पुरवठा बंद असल्याने या बस गाड्या अनियमित येत असून प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.काही लांब पल्ल्याच्या बस रद्द करण्यात आल्या आहे.

Raver-Agara-electricity-shutdown-due-to-state-transport-corporation-bus-trains-irregular,-some-cancelled


सविस्तर वृत्त असे की सावदा येथून शेकडो  प्रवासी महिला व पुरुष युवक कामानिमित्त व शिक्षणानिमित्त बाहेरगावी  जळगाव भुसावळ औरंगाबाद नाशिक येथे जात असतात पण आज शनिवार रोजी सकाळपासून रावेर आगारातून लांब पल्ल्याच्या बस  स्थानकावर दिसत नव्हत्या तर काही कर्मचाऱ्यांनी असे सांगितले की वादळामुळे वीजतारा तुटल्याने विज प्रवाहरावेर  आगारामध्ये नसल्याने बस तिकीट मशीन चार्जिंग न झाल्याने व तांत्रिक अडचण येत असल्याने या बस गाड्या वेळेवर निघू शकले नाही. तर काही रद्द करण्यात येत आहे. यामुळे सावदा येथून इच्छित स्थळी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. त्यांना ऑटोकडे वळावे लागले व ऐन वेळेवर प्रवास करावा लागला. सकाळची हायकोर्ट रावेर ते औरंगाबाद एक्सप्रेस बस साडेपाचला निघणारी ही साडेआठ वाजता आली व त्यानंतर दोन बस  अकरा वाजेपर्यंत लांब पल्ल्याच्या बस आल्या.त्याआधी मिळेल त्या वाहनाने  प्रवाशी प्रवास केला.  काही वाहक चालकांचे म्हणणे आहे ते बस डेपो मध्ये पिण्याच्या पाणीही नसून प्रवाशांसह वाहक चालकांचेही पिण्याच्या पाण्यापासून हाल होत आहे तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे व तत्काळ उपयोजना करून पूर्ववत बस व पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवासी व वाहक चालक करीत आहे.इतर आगराच्या बस नियमित सुरू होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.