समोरा-समोर ट्रॅक च्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू तर,दोघे बचावले
समोरा-समोर ट्रॅक च्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू तर,दोघे बचावले
लेवाजगत न्युज चाळीसगाव : छत्रपती संभाजीनगरकडून धुळ्याकडे लोखंडी पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रकला समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात ट्रकमधील लोखंडी पाईप ट्रकच्या कॅबीनमध्ये घुसून त्याखाली दाबल्या गेल्याने ट्रक चालकाचा जागीच मृत्यू ओढवला आणि अन्य दोघ जण वाहनात अडकले मात्र महामार्ग पोलिसांनी प्रयत्न करून या दोघांना वाचविल. हा अपघात कन्नड घाटातील मेणबत्ती पॉईंटजवळ मंगळवारी पहाटे 6 वाजेच्या सुमारास घडला. संतोषकुमार पांढरे ( वय 42, बिदर, कर्नाटक) असे मृत चालकाचे नाव आहे.
संतोषकुमार हा जिंदाल कंपनीचे जवळपास 150 लोखंडी पाईप ट्रकमध्ये भरून संभाजीनगरकडून धुळ्याकडे जात होता. त्याच्यासोबत अन्य दोघे जण होते. लोखंडी पाईप भरलेला हा ट्रक घाट उतरत असतांना घाटातील मेणबत्ती पॉईंटजवळ समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. समोरासमोर जबर धडक बसल्याने ट्रकमधील लोखंडी पाईप कॅबीनमध्ये घुसल्याने त्यात तो दाबला जावून संतोष पांढरे याचा जागीच मृत्यू झाला, तर या पाईपांमध्ये ट्रकमधील अन्य दोघे जण अडकले होते. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्राचे उपनिरीक्षक भागवत पाटील, हवालदार विरेंद्र शिसोदे यांच्यासह चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे नंदू परदेशी, राहूल जाधव यांनी धाव घेत महामार्गच्या क्रेनद्वारे या जखमींना ट्रकमधून बाहेर काढून रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
दोघांना वाचवण्यात यश
पोलीस अपघातस्थळी पोहोचले तेव्हा दोघे लोखंडी पाईपाखाली दाबले गेल्याचे दिसून आले तर काही पाईप रस्त्यावर विखूरले होते. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून अडकलेल्या या दोघांना वाचविले. मदतकार्यास थोडाही उशीर झाला असता तर या दोघांच्या जीवावर बेतले असते. दोघांचा जीव वाचल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या थरकाप उडवणाऱ्या अपघातामुळे घाटातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. तरी सर्वांना कळविण्यात येते की गाडी चालवताना सतर्कतेने चालवावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत