Header Ads

Header ADS

शिरगाव साई मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा, शिरगाव येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त घेतले साईचे दर्शन

Shirgaon-Sai-Mandir-anniversary-day-celebrated-at-Shirgaon-School-Education-Minister-Deepak-Kesarkar-visited-Sai-Mandir-on-the-anniversary-day-of-Sai.

 

शिरगाव साई मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा,

शिरगाव येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त घेतले साईचे दर्शन 

उरण (लेवाजगत प्रतिनिधी सुनिल ठाकूर )शिरगाव येथील प्रतीशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साई बाबा मंदिराचा २१ वा वर्धापन दिन रविवार दिनांक 11जून 2023रोजी  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त शिरगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंदिराचे मुख्य विस्वस्थ माजी आमदार प्रकाश देवळे दिली.

शिरगाव साई मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा,  शिरगाव येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी साई मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त घेतले साईचे दर्शन


वर्धापन दिनास चारिटी कमिशनर पुणे चे बुके साहेब. ठाण्याचे जंत्रे साहेब. आळंदी साई देवस्थान चे अध्यक्ष सुभाष निलगे. माजी नगरसेविका तथा अध्यक्षा आदर प्रतिष्ठान पुणे च्या सौ. साईदिशा माने. आदीमोठ्या संख्येने साई भक्तांची उपस्थिती लाभली होती.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त सायंकाळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंदिरास भेट देवून साईबाबांची आरती केली.  संस्थानाच्या  वतीने केसरकर यांचा बाबांची मूर्ती शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. रविवार दि ११ रोजी सकाळी साई बाबांचा अभिषेक देवळे व सचिव सपना लालचंदानी यांच्या हस्ते करण्यात आला.

साई भक्तांना मंदिरातर्फे महाप्रसादाची मोफत सोय करण्यात आली होती. तसेच दिवसभर वेगवेगळ्या गायकांची भजन रुपी सेवा अर्पण केली. सायंकाळी आरती झाल्यानंतर मंदिराभोवती पालखी फेऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या पालखी फेऱ्यात शेकडो साई भक्तांनी मोठ्या उत्साहाने आपला सहभाग नोंदवला.पालखीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती त्यामुळे मंदिराच्या सौदर्यात भर पडली होती. मंदिराचा गाभारा अत्यंत चित्ताकर्षक फुलांनी सजवला होता त्यामुळे मंदिराला एक वेगळ्या प्रकारचे सौदर्य प्राप्त झाले होते. 

 कार्यक्रमासाठी मंदिराच्या, विश्वस्त रवी जाधव,विभावरी जाधव मंदिराचे व्यवस्थापक अनिल देवकर, राकेश मुगळे, विजय लोखंडे, रमेश फरताडे, संतोष चव्हाण, मच्छिंद्र कापरे, लक्ष्मीकांत ठाकुरद्वारे, विष्णू कदम, गणेश कपिले,अर्जुन दहिभाते, सिद्धाजी  माने, विजय हुंबे, साकेत कारंजकर, राधेशाम वारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.