तापी जन्मोत्सव धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनांनी भक्तीपूर्ण धार्मिक वातावरणात उत्साहात साजरा
तापी जन्मोत्सव धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनांनी भक्तीपूर्ण धार्मिक वातावरणात उत्साहात साजरा
लेवाजगत न्यूज भुसावळ-हिंदू धर्माच्या ग्रंथा व पुराणानुसार जेवढे महत्त्व गंगा, नर्मदा या नद्यांना आहे तेवढेच महत्त्व तापी नदीचे ही आहे . खानदेशातील शेतीच नाही तर समाज जीवन समृद्ध करणाऱ्या जीवनदायी तापी नदीचे भुसावळ शहराला लाभलेल्या वरदानाला व उपकाराला लक्षात घेता तापी उत्थान एवम उत्सव सेवा समिती, सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था, नॅशनल युथ क्लब, सप्तशृंगी माता बहुउद्देशीय संस्था, बहुभाषिक ब्राह्मण समाज, विश्व ज्योती उत्सव मंडळ, चिंतामणी मोरया ग्रुप, जय लेवा ग्रुप आदी नऊ संस्थानमार्फत दिनांक २५ जून २०२३ म्हणजेच आषाढ शुद्ध सप्तमी सकाळी नऊ वाजता इंजिन घाटाजवळ तापी नदीची विधिवत पूजा अर्चा करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी येथे तापी जन्मोत्सवानिमित्त सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली होती. या महापूजेमध्ये कामिनी शशिकांत नेवे, श्रद्धा देवेश कुलकर्णी, वैशाली योगेश चौधरी, आराधना लोकेश चौधरी, इंद्रा चौधरी, राजश्री - उमेश नेवे, आदीं ७ जोडप्यांनी सहभाग घेतला. भुसावळ मध्ये सर्वप्रथम तापी नदी जन्मोत्सव सार्वजनिक रित्या साजरा करण्याचे संस्थेचे हे २३ वे वर्ष आहे २००१ पासून भुसावळ मध्ये तापी जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. येथील तापी उत्थान उत्सव सेवा समिती सह विविध संस्थांनी पुढाकार घेत सकाळी नऊ वाजेपासूनच तापी नदी पात्रात जन्मोत्सवाचे आयोजन करण्यास पूर्व तयारी केली. नदीपात्रात जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फे आकर्षक रांगोळी काढून व मंगल वाद्य वाजवून धार्मिक वातावरण निर्मिती करण्यात आलेली होती. सकाळी नऊ वाजता तापी नदी पात्रात तापी नदीच्या पूजनाला पंडित जय प्रकाश शुक्ला यांच्याद्वारे पूजेस प्रारंभ झाला. यावेळी पूजेचे मुख्य यजमान यांच्यासोबत उपस्थित भाविकांनी पूजेत सहभाग घेतला. पूजेनंतर नदी पात्रात महाआरती करण्यात आली. तापी मातेची ओटी भरून महावस्त्र म्हणजे साडी व चोळी नदीला अर्पण करण्यात आली. यावेळी तापी प्रेमी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजा झाल्यानंतर उपस्थितांना तापी नदीचे धार्मिक महत्त्व पंडित जयप्रकाश शुक्ला यांनी, भौगोलिक महत्त्व पीपल्स महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर संजय विठ्ठल बाविस्कर तसेच तापी नदी वर संशोधन म्हणजेच पीएचडी केलेले प्राध्यापक ढाके यांनी तापी नदी बद्दल उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
तापी जन्मोत्सवास उपस्थित सर्व भाविकांचे व विविध संस्थांचे आभार सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ राजश्री उमेश नेवे यांनी मानले. तापी जन्मोत्सवाच्या यशस्वीतेसाठी तापी उत्थान उत्सव सेवा समितीचे अध्यक्ष प्रशांत रामदासजी वैष्णव, अँड. मेघा वैष्णव, गोविंद अग्रवाल, संतोष टाक, गोकुळ अग्रवाल, तसेच सखी श्रावणी महिला बहुउद्देश्य मंडळाच्या अध्यक्षा सौ राजश्री उमेश नेवे, उमेश नेवे, भाग्यश्री नेवे, माया चौधरी, वंदना झांबरे, सीमा नेवे, मनीषा कुलकर्णी, अर्चना इंगळे, जयश्री वाणी, आराधना चौधरी, मोहिता चौधरी, तसेच गो सेवक रोहित महाले, प्रसाद भापकर, वीरेंद्र तुरकेले, सागर कले, तुषार धासौले, जितेंद्र खडके, दिलीपकुमार टाक, सप्तशृंगी माता बहुउद्देश्य संस्थेचे दिनेश महाजन, सचिन पाटील, बहुभाषिक ब्राह्मण समाजाचे जयप्रकाश शुक्ला, कैलास उपाध्याय, दीपक जैन, नमा शर्मा, श्रीकृष्ण चोरवडकर, राजू गुरव , यांच्यासह भारती रामदास वैष्णव, श्रीमती विमल रामदास वैष्णव, ज्योती शर्मा, सोनम ठाकुर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत